आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मावर बायोपिक बनवणार विनोद तिवारी, कृष्णा अभिषेक साकारु शकतो कपिलची भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: संजय दत्तचा बायोपिक 'संजू' पाहिल्यानंतर डायरेक्टर विनोद तिवारीने एक बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाची कथा कपिल शर्माच्या आयुष्यातील स्ट्रगलवर आधारित आहे. विनोद तिवारीने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त केली. विनोद हे तेरी भाभी है पगले या चित्रपटातून डायरेक्टरच्या रुपात डेब्यू करत आहे. चित्रपटात कृष्णा अभिषेक प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटातून संजय दत्तची भाची नाजिया हुसैनही बॉलिवूड डेब्यू करतेय. 


कपिलसोबत करायचा होता चित्रपट 
चित्रपटाविषयी विनोदने सांगितले की, त्याला 2010 पासून कपिल शर्मासोबत एक चित्रपट बनवायचा होता. परंतू आता प्रोड्यूसर सुरेंद्र पुरी या चित्रपटासाठी तयार नव्हते. आता त्यांनाही एक बायोपिक बनवायचा आहे. कपिलची कथा बायोपिकसाठी परफेक्ट असेल.
- विनोद यांनी सांगितले की, कपिलच्या आयुष्यातील स्ट्रगल या कथेतून सर्वांसमोर यायला पाहिजे.


कृष्णा करु शकतो कपिलची भूमिका
कपिलच्या बायोपिकमध्ये कपिलची भूमिका कोण साकारणार याविषयी प्रश्न विचारल्यावर विनोदने उत्तर दिले की, कपिलने स्वतः त्याच्या बायोपिकमध्ये काम केले तर चांगले होईल. जर त्याने नकार दिला तर कृष्णा अभिषेक भूमिका साकारेल.
- कृष्णा स्वतः एक कॉमेडिअन आहे आणि तो कपिलच्या भूमिकेसोबत पुर्ण न्याय करु शकतो. 

 

 

बातम्या आणखी आहेत...