Home »TV Guide» Sapna Choudhary Item Song In Bhojpuri Movie

समोर आला सपना चौधरीचा भोजपुरी लुक, येथे शूट केला आयटम साँग...

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 13:16 PM IST

बिग बॉस-11 फेम हरियाणी सिंगर आणि डान्सर सपना चौधरीचा भोजपुरी लुक समोर आला आहे. ती लवकरच भोजपुरी फिल्म 'बैरी कंगना-2' मध्ये दिसणार आहे. सपानाने बुधवारी महाराष्ट्राच्या विरारमध्ये भोजपुरी स्टार रवि किशन स्टारर फिल्म 'बैरी कंगना-2' चा एक आयटम साँग शूट केला. शूटिंगचे काही फोटोज समोर आले आहेत.

सपनाविषयी कोरियोग्राफर म्हणाला असे
सपनाचा आयटम साँग संजय कोर्वाने कोरियोग्राफ केला आहे. सपनाविषयी संजय म्हणाला की, सपना एक चांगली डान्सर आणि अॅक्ट्रेस आहे. तिच्याकडून जेवढी अपेक्षा होती, त्यापेक्षा जास्त बेस्ट काम तिने केले. संजयने सांगितले की, भोजपुरी ऑडियन्ससाठी सपना ही वेलकम गिफ्ट असेल.

आयटम साँग शूट केल्यानंतर सपना म्हणाले हे...
आयटम साँग शूट केल्यानंतर सपना चौधरी म्हणाली की, माझ्यासाठी ऑडियन्स आणि स्टेज समान आहेत. बिग बॉसनंतर माझे फॅन्स अजून वाढले आहेत. यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. माझ्याजवळ फिल्मच्या ऑफरही आहेत. मी मर्यादा राखून प्रत्येक फिल्म करेल. माझ्यासाठी सर्वच कॅरेक्टर समान आहेत. यामुळे मी याला लहान किंवा मोठे मानत नाही. एक कलाकार म्हणून माझा एकच प्रयत्न असतो की, मी जे काही करेल ते माझ्या फॅन्सला आवडावे. ही माझी पहिली भोजपुरी फिल्म आहे. यामध्ये मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतेय. आरएसव्हीपी प्रोड्क्शन बॅनरमधील फिल्म 'बैरी कंगना-2' मध्ये रवि किशनसोबतच दोन सुंदर भोजपुरी अॅक्ट्रेस काजल राघवानी आणि शुभी शर्मा दिसणार आहेत.


कोण आहे सपना चौधरी
सपनाचा जन्म दिल्लीच्या महिपालपुरमध्ये झाला होता. तिचे सुरुवातीचे शिक्षण रोहतकमढून झाले. तिचे काम जवळच एका कंपनीमध्ये काम करत होते. 2008 मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा ती 12 वर्षांची होती. यानंतर तिची आई नीलम आणि भाऊ-बहिणींची जबाबदारी तिच्यावर आली. सपनाने सिंगिंग आणि डान्सिक फक्त करियर म्हणून निवडले नाही. तर या बळावर तिने आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवला. मोठ्या बहिणीचे लग्न सपनाने आपल्या बळावर केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सपनाचे भोजपुरी लुकमधील फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended