आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CID फेम जसवीर कौरने शेअर केला 10 दिवसांच्या मुलीचा पहिला फोटो, 2 वर्षांत तुटले होते पहिले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'CID', 'ससुराल सिमर का', 'वारिस' आणि 'हिटलर दीदी' या मालिकांमध्ये झळकलेली टीव्ही अभिनेत्री जसवीर कौर आई झाली आहे. 26 जून रोजी मुंबईतील एस एल रहेजा रुग्णालयात जसवीरने गोंडस मुलीला जन्म दिला. जसवीरने आपल्या मुलीचे नाव नायरा असे ठेवले आहे. आता तिची लेक फक्त दहा दिवसांची आहे. जसवीरने नायराचा पहिला फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती चिमुकली नायरा आणि पती विशाल मदलानीसोबत दिसतेय. हे या दाम्पत्याचे पहिले अपत्य आहे. 


बिझनेसमनसोबत झाले जसवीरचे दुसरे लग्न...
- जसवीरचे पहिले लग्न 2006 मध्ये अजीज नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. पण दोन वर्षांतच हे लग्न मोडले आणि त्यांचा घटस्फोट झाला. 
- त्यानंतर मुंबई बेस्ड बिझनेसमन विशाल मदलानीला दोन वर्षे डेट केल्यानंतर 28 फेब्रुवारी 2016 रोजी जसवीरने त्याच्यासोबत साखरपुडा केला.
- 6 मार्च 2016 रोजी जसवीरने विशालसोबत दुसरे लग्न केले. या लग्नात टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 


'मोहब्बतें'मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती जसवीर...
- जसवीरने 'हिटलर दीदी' या मालिकेतील लीड कॅरेक्टर इंदु उर्फ इंदिरा शर्मा (रति पांडे) ची वहिनी सविता शर्माची भूमिका वठवली होती. 
- याशिवाय ती 'घर की लक्ष्मी बेटियां', जय वीरू', 'कृष्ण कन्हैया' आणि 'इश्क का रंग सफेद' या मालिकांमध्ये झळकली आहे.
- इतकेच नाही तर जसवीरने शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय स्टारर 'मोहब्बतें' या चित्रपटात बॅकग्राउंड डान्सरच्या रुपातही काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...