आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता...'मध्ये सतीश कौशिक साकारु शकतात डॉ. हाथीचा रोल, मेकर्स करत आहेत बातचीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्क-'तारक मेहता का उल्टा चश्मा'  या मालिकेतील डॉ. हाथीच्या भूमिकेसाठी निर्माते असित मोदी नवीन चेह-याचा शोध घेत आहेत. त्यांनी सांगितले की, मालिकेतून डॉ. हाथीची भूमिका संपवण्यात येणार नाही.  दोन नावे असित मोदींच्या विचारात असून त्यापैकी एक नाव अभिनेते सतीश कौशिक यांचे तर दुसरे नाव निर्मल सोनी यांचे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी यांनी अलीकडेच या भूमिकेसाठी सतीश कौशिक यांना विचारणा केली आहे. पण सतीश यांनी अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. जर सतीश कौशिक यांनी नकार दिला, तर मग निर्मल सोनी यांना अप्रोच केले जाणार आहे.


निर्मल सोनी म्हणाले, भूमिकेसाठी विचारणा झाल्यास नक्की करणार विचार...
- DainikBhaskar.com ने जेव्हा या संदर्भात निर्मल सोनी यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सांगितले, "अद्याप मला विचारणा झालेली नाही. पण जर असे घडले, तर नक्की विचार करेल. यापूर्वी मीच ही भूमिका साकारली होती. रंजक बाब म्हणजे मी डॉ. हाथींच्या भावाची भूमिकादेखील साकारली होती. जर पुन्हा अशी संधी मिळाली, तर ही भूमिका नक्कीच करायला आवडेल." याविषयी अद्याप असित मोदी आणि सतीश कौशिक यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही.

 

एक वर्ष निर्मल सोनींनी साकारली होती डॉ. हाथीची भूमिका...
- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका 2008 मध्ये सुरु झाली. त्यावेळी वर्षभर निर्मल सोनी यांनी ही भूमिका वठवली होती. पण नंतर मात्र तारखांच्या अडचणींमुळे त्यांनी हा शो सोडला होता. 2009 मध्ये कवि कुमार आजाद यांनी शोमध्ये डॉ. हाथीची भूमिका साकारायला सुरुवात केली होती.
-9 वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर आजाद यांचे 9 जुलै 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पण त्यांचे पडद्यावरील पात्र आजही जिवंत आहे. त्यामुळे शोमध्ये असित मोदी दुस-या कलाकाराला आणू इच्छितात.


या चित्रपटांमध्ये झळकले आहेत सतीश कौशिक
- सतीश कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात सहायक दिग्दर्शक म्हणून शेखर कपूर यांच्यासोबत 'मासूम' या चित्रपटाद्वारे केली होती. मि. इंडिया(1987), राम लखन(1989), सरकार(1993), अंदाज(1994), मेरे सपनों की रानी(1997), आंटी नंबर वन(1998), घरवाली बाहरवाली(1998), क्योंकि मैं झूठ नहीं बोलता(2001), गॉड तुस्सी ग्रेट हो(2008), रास्कल(2011), उडता पंजाब(2016), कमांडो(2017) यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सतीश कौशिक झळकले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...