आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos:आतून इतके सुंदर आहे बिग बॉस विनर शिल्पा शिंदेचे घर, आईसोबत राहते एकटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'अंगुरी भाभी' नावाने प्रसिद्ध असलेली शिल्पा शिंदे बिग बॉस 11ची विजेती ठरली आहे. अनेक तर्कवितर्कानंतर अखेर बिग बॉस 11 चा मुकुट तिच्यावर विराजमान झाला आहे. हिना खान आणि विकास गुप्ता यांना पछाडत शिल्पा शिंदेने बाजी मारली आणि बिग बॉसच्या घरावर मराठी झंडा रोवला. त्यानिमित्त आज खास शिल्पाच्या घराचे इनसाईड फोटोज् आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 

मुंबईच्या मालाड भागात शिल्पा शिंदेचे घर आहे. या घरामध्ये ती आईसोबत एकटी राहते. घराच्या फोटोंसोबतच तिच्याविषयी काही खास माहितीही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हायकोर्टमध्ये जज होते वडील...

 

- शिल्पाचा जन्म सर्वसामान्य मराठी कुटुंबात झाला. तिचे वडील हायकोर्टमध्ये जज होते. शिल्पा जेव्हा सब टी.व्ही च्या 'चिडीयाघर' कार्यक्रमात 'कोयल'ची भूमिका करत होती तेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले. शिल्पाला दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ आहे तर आई गृहिणी आहे.
- शिल्पाने मुंबईच्या के. के. सी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. तिने सायकॉलॉजीमध्ये स्पेशल कोर्सही केला आहे. शिल्पाच्या वडिलांना वाटत होते की तिने वकिली क्षेत्रात यावे पण नेहमीच क्रिएटीव गोष्टींची आवड असल्याने शिल्पाचे मन अभ्यासातच रमत नव्हते.
शिल्पाला जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घ्यायची फार इच्छा होती पण त्यावेळी त्या कोर्सेसची फी आवाक्याबाहेर असल्याने शिल्पाचे ते स्वप्न पूर्ण झाले नाही.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा शिल्पाच्या घराचे इनसाईड फोटोज् आणि जाणून घ्या तिच्या काही खास गोष्टी..

बातम्या आणखी आहेत...