आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबईः अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसह व्होग 'वोग न्यू बीएफएफ' या चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री नेहा धुपिया करते. या शोमध्ये शाहिद आणि मीरा यांनी त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत अनेक मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी नेहा धुपियाने दोघांनाही त्यांच्या सेक्स लाइफविषयी प्रश्न विचारले. हे प्रश्न ऐकून एकीकडे शाहिद लाजून उत्तर देणे टाळले. तर त्याची पत्नी मीरा मात्र बिनधास्तपणे या विषयावर बोलली.
काय होता नेहाचा प्रश्न आणि काय दिले मीराने उत्तर...
- नेहाने शाहिद आणि मीरा यांना त्यांची बेडवरची आवडती सेक्स पोझिशन कुठली असा प्रश्न विचारला. साहजिकच अतिशय खासगी प्रश्नाचे उत्तर देणे प्रत्येकालाच जमते असे नाही. त्यामुळेच शाहिदने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. पण मीरालासुद्धा या प्रश्नाचे उत्तर न देण्याचा इशारा केला.
- पण मीराने या प्रश्नाचे उत्तर दिले. ती म्हणाली, "माझ्या मते, शाहिद कंट्रोल फ्रीक (सतत कंट्रोल करण्याची सवयी) आहे. पण याबाबतीत तो नेहमी माझे मत घेतो आणि काय करायचे विचारतो."
शाहिद म्हणाला- 'एका महिलेने मला धोका दिला'
- या चॅट शोमध्ये शाहिदने एक धक्कादायक खुलासा केला. तोसुद्धा आपल्या लग्नापूर्वीच्या रिलेशनशिपबद्दलचा. ‘इशारों इशारों’मध्ये शाहिद कपूर आपल्या ‘एक्स’बद्दल बोलून गेला.
- शोमध्ये नेहा धूपियाने शाहिदला त्याच्या लव्हलाईफबद्दल विचारले. तू कधी तुझ्या को-स्टारच्या प्रेमात पडला आहेस का? असा प्रश्न नेहाने शाहिदला विचारला.
- हा प्रश्न शाहिद शिताफीने टाळणार, असे वाटत असतानाच त्याने याला होकारार्थी उत्तर दिले.
- शाहिद म्हणाला, ''होय, एकदा नाही तर दोनदा मी माझ्या को-स्टारच्या प्रेमात पडलो. यापैकी एक तर आजही खूप लोकप्रिय आहे. पण तिने मला धोका दिला."
- आता शाहिदचा इशारा कुणाकडे होता, हे तुम्ही समजू शकता. होय, त्याचा इशारा कदाचित करीना कपूरकडे होता. शाहिद आणि करीनाच्या रिलेशनशिपच्या बातम्या एकेकाळी प्रचंड गाजल्या होत्या.
अशी आहे शाहिद आणि मीराची लव्ह स्टोरी, वाचा पुढील स्लाईडवर..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.