आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद मल्होत्राने केले दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबतही ब्रेकअप, म्हणाला-\'ज्योतिषाच्या सांगण्यावरुन तोडले नाते\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिव्यांका त्रिपाठीचा एक्स बॉयफ्रेंड आणि टीव्ही अभिनेता शरद मल्होत्राचे ब्रेकअप झाले आहे. शरद दोन वर्षापासून 'स्पिलट्सविला'ची एक्स कंटेस्टेंट पूजा बिष्टला डेट करत होता. याअगोदर हे दोघे 2018मध्ये लग्न करणार अशा चर्चा होत्या. यावेळी पूजाने ब्रेकअपचे खरे कारण सांगितले आहे. तिने सांगितले की, दोघांचे वेगळे     होण्याचे कारण शरदने नवीन अफेअर आहे आणि तो सध्या दुसऱ्या कोणा मुलीला डेट करत आहे. पूजा म्हणाली, शरदने केले तिला चीट..


पूजाने सांगितले "गेल्या 6 महिन्यांपासून त्याचे वागणे फारच बदलले होते. तो अचानक माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मला जाणवले. मला अगोदर वाटले की हे तणावामुळे होत असेल पण मला अजिबात अंदाज नव्हता की तो रिलेशनशीप संपवण्याच्या तयारीत आहे. "

- "जवळपास दोन महिन्यापासूनच मला कळाले होते की तो सतत कामानिमित्त कोणा एका मुलीला भेटत आहे आणि नेहमीच लग्नाची तारीखही बदलत आहे. जेव्हा त्या मुलीबद्दल विचारले तेव्हा शरदने सांगितले की त्याच्या मॅनेजरने भेटवले पण खरे तर हे आहे की हे दोघे इन्सटाग्रामवर भेटले." 
- ब्रेकअप करताना शरदने सांगितले की "मला तुझ्यासाठी काहीही फिलींग नाही. त्याने मला दोन महिन्यांपूर्वीच सांगितले होते की त्याच्या ज्योतिषाने त्याला माझ्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. "
- 'शरद त्याची आई आणि ज्योतिषीचे ऐकून मला सोडू इच्छित होता मला समजायला वेळ लागला की तो मला 2 महिन्यांपासून चीट करत आहे."
- मुंबईत पूजा मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने एमटीव्हीच्या डेटिंग रियलिटी शो 'स्प्लिट्स विला' मध्ये काम केले आहे.

 

यावर शरदने सांगितले की, "कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे नव्हे तर ज्योतिषाच्या म्हणण्यावरुन हे ब्रेकअप झाले आहे." शरदने सांगितले की त्याच्या आईने 10 दिवसांअगोदरच बोलणी केली आणि त्यात अॅस्ट्रोलॉजरने हे लग्न करण्यास नकार दिला. 
शरद म्हटला "हो ही माझी चुकी आहे की मी ही गोष्ट अडीच महिन्यांपासून सांगितली नाही कारण सर्वप्रथम मलाच या निर्णयाबद्दल श्योर व्हायचे होते. "

 

3 वर्षापूर्वी दिव्यांकासोबत होते अफेअर..
- शरद आणि 'ये हैं मोहब्बते' फेम एक्ट्रेस दिव्यंका त्रिपाठी जवळपास 8 वर्षांपर्यंत रिलेशनशीपमध्ये होते. तीन वर्षांपूर्वी शरदचे ब्रेकअप झाले आहे. यांच्यामध्ये जेव्हा अफेअर सुरु झाले तेव्हा ते दोघे 'बनूं मैं तेरी दुल्हन' मालिकेत काम करत होते. पण या दोघांनी कधीच त्यांचे रिलेशनशीप कबुल केले नाही.
- पण काही कारणाने 2015 साली ही जोडी वेगळी झाली आणि जुलै 2016 साली दिव्यांकाने विवेक दहीयासोबत लग्न केले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शरद मल्होत्राचे काही खास फोटोज्..

 

बातम्या आणखी आहेत...