आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिल्पा शिंदेच्या फॅनने दिली हिना खानचा MMS लीक करण्याची धमकी, बॉयफ्रेंडला आला राग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : शिल्पा शिंदे आणि हिना खानचे भांडण अजून सुरुच आहे. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतरही दोघी एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. काही दिवसांपुर्वी शिल्पाने सोशल मीडियावर एक एडल्ट व्हिडिओ शेअर केल्यामुळे हिना आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जायस्वालने तिच्यासोबत भांडण केले होते. एवढेच नाही तर सोशल मीडियावर हिना आणि शिल्पाचे फॅन्सही एकमेकांवर भिडले होते. 


फॅनने दिली MMA लीक करण्याची धमकी...
आता हे प्रकरण खुप जास्त वाढले आहे आणि शिल्पाच्या फॅन्सने सोशल मीडियावर हिनाला धमकी दिली आहे. हिनाचे एमएमएस लीक करेल अशी धमकी त्याने दिली आहे. 
- हे ट्वीट व्हायरल होताच रॉकी जायसवाल फॅन्सवर चिडला. त्याने लिहिले की, 'तुम्ही आपसात आमच्याविषयी वाईट बोला आणि खुश राहा. तुम्ही हेच करु शकता, तुमच्या नॉनसेन्स कमेंट वाचून हसायला येते. नॉन सेन्स लॉजिक आणि कम्पेरिजन आणि शिव्यांनी काहीच फरक पडत नाही.'


शिल्पाने काय लिहिले
शिल्पा जेव्हा बिग बॉस घरात होती तेव्हा तिचा एक एमएमएस व्हायरल झाला होता आणि सांगितले जात होते की व्हिडिओमध्ये शिल्पा शिंदे आहे. या व्हिडिओत शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता आहेत असे म्हटले जात होते. बिग बॉस बाहेर आल्यानंतरजेव्हा शिल्पाला त्या एमएमएसचा खरा व्हिडिओ मिळाला तेव्हा तिच्या बदनामीचा बदला घेण्यासाठी तो व्हिडिओ 21 एप्रिलला ट्वीट केला.

 

शिल्पाने लिहीले, "जरा पाहा, ज्यांच्याजवळ कोणताच कामधंदा नसतो ते दुसऱ्यांचे आयुष्य कसे बर्बाद करतात आणि कोणत्या हद्दीपर्यंत जातात." त्यानंतर व्हिडिओ शेअर करतांनी ती म्हणाली की, "हाच तो व्हिडिओ जो माझ्या नावाने पसरवला जात आहे. "


टीव्ही अभिनेत्री हिना खान आणि बॉयफ्रेंड रॉकी यांनी घेतले फैलावर...
शिल्पा यांनी जसे ट्वीट केले तेव्हा तिच्यावर टीका करण्यात आली. हिना खानच्या बॉयफ्रेंडने लिहीले, शिल्पा तुझ्यासोबत जे झाले ते चुकीचे झाले. पण एक जबाबदार सेलिब्रेटी म्हणून सोशल मीडियावर पॉर्न व्हिडिओ अपलोड करणे किती योग्य आहे. याऐवजी शिल्पाने पोलीसांकडे तक्रार करायला हवी होती कारण एका दुसऱ्या स्त्रीचा व्हिडिओ टाकताना तिने त्या स्त्रीची सहमती घेतली की नाही असा प्रश्न तिने केला आहे.

 

बॉयफ्रेंडला सपोर्ट करताना हिना म्हणाली की, "हे फारच दुःखद आहे की सोशल मीडीयावर ट्रोलिंग करताना कोणी काहीही पोस्ट करतात पण सेलिब्रेटी असल्याने आपले ट्वीट खूप लोकांपर्यंत पोहोचते त्यामुळे अशाप्रकारे सेलिब्रेटींनी व्हिडिओ पोस्ट करु नये."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा रॉकीचे पुर्ण ट्वीट...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...