आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेन डान्सनंतर शिल्पाने केला नागिन डान्स, Video झाला व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारलेल्या शिल्पा शिंदेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये ती सुनील ग्रोवरसोबत नागिन डान्स करताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ 'जियो धन धना धन' मधील आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा आणि सुनीलची फनी केमिस्ट्री दिसतेय. 


'जानी दुश्मन' च्या गाण्यावर केला डान्स

- शिल्पा आणि सुनील ज्या गाण्यावर डान्स करत आहेत, ते गाणे 2002 मधील मल्टीस्टारर चित्रपट 'जानी दुश्मन' मधील आहे. राजकुमार कोहलीच्या या चित्रपटात अरमान कोहलीने नाग आणि मनीषा कोइरालाने नागिनची भूमिका साकारली होती. यापुर्वी शिल्पा आणि सुनीलचा रेन डान्सही व्हायरल झाला होता. तेव्हा या दोघांनी सैफ अली खान आणि राणी मुखर्जी स्टारर 'हम तुम' च्या टायटल ट्रॅकवर डान्स केला होता.

 

शिल्पाने यापुर्वीही केला आहे नागिन डान्स
शिल्पा शिंदेने यापुर्वीही नागिन डान्स केला आहे. जानेवारीमध्ये 'बिग बॉस 11' च्या ग्रँड फिनाले दरम्यान शिल्पा को-कंटेस्टंट विकास गुपतासोबत 'मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा' वर नागिन डान्स करताना दिसली होती. शिल्पा या शोची विजेती ठरली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता नागिन डान्स दरम्यानचे शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...