आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शिंदेने खर्च केली नाही बिग बॉस 11च्या बक्षिसाची रक्कम, पैशांतून करणार आहे हे खास काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रियालिटी शो 'बिग बॉस' सीजन 11 जिंकल्यानंतर शिल्पा शिंदे सध्या टीव्ही शोजपासून दूर आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 'बिग बॉस' जिंकल्यानंतर आतापर्यंत तिने बक्षिसात मिळालेली 44 लाख रक्कम खर्च केलेली नाही. रिपोर्ट्सनुसार शिल्पा शिंदेने हे पैसे कुठे खर्च करायचे हे ठरवले आहे. 


म्हाता-या आई-वडिलांची मदत करणार शिल्पा...
- शिल्पा शिंदेने नुकताच एका लीडिंग एन्टटेन्मेंड वेबसाइटला मुलाखत दिली. यामध्ये तिने सांगितले की, ती 44 लाख रु. काय करणार आहे.
- शिल्पाने सांगितले, "मी शोमध्ये जाण्यापुर्वीच ठरवले होते की, जर मी शो जिंकला तर मिळालेल्या पैशांनी वडिलांचे स्वप्न पुर्ण करेल. ज्या वयस्कर लोकांची घरात काळजी घेतली जात नाही, मला त्यांच्यासाठी हक्काची जागा बनवायची आहे. हे लोक ओल्ड एज होममध्ये येऊन राहू शकता आणि आपल्या वयाच्या लोकांसोबत वेळ घालवू शकता."
- बिग बॉसच्या घरातही शिल्पाला ऑडियन्सने तिच्या चांगल्या कामामुळे पसंत दिली होती. शिल्पा एकटीच सर्व कंटेस्टेंसाठी जेवण बनवायची.
- 'बिग बॉस' मध्ये विजेत्याला 50 लाख रुपये मिळत असतात. परंतू कंटेस्टंट विकास गुप्ता एका टास्कमध्ये 6 लाख रुपये जिंकल्यामुळे शिल्पा शिंदेला 44 लाख रुपये मिळाले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिल्पा शिंदेचे निवडक फोटोज...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...