आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पाचे Glamorous फोटोशूट पाहिलंत का तुम्ही! म्हणतेय, चाहत्यांचे प्रेम पाहून मी भारावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 11' या रिअॅलिटी शोची विजेती ठरलेल्या शिल्पा शिंदेने अलीकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर माया सिंग यांनी शिल्पाचा ग्लॅमरस अंदाज त्यांच्या कॅमे-यात कैद केला आहे. याशिवाय शिल्पा वेडिंग अफेअर या मॅगझिनच्या कव्हर पेजवर नववधुच्या रुपात झळकली आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटोशूट लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. या फोटोशूटसोबतच शिल्पाने नुकतीच एक मुलाखत दिली असून यामध्ये 'बिग बॉस' जिंकल्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलले याविषयी सांगितले आहे. चला तर मग काय म्हणतेय शिल्पा जाणून घेऊयात...  

 

नाकारली 'खतरों के खिलाडी'ची ऑफर...
शिल्पा शिंदेला सध्या अनेक टीव्ही शोच्या ऑफर येत आहेत. मात्र टीव्ही शो करणार नसल्याचे तीने यापूर्वीच सांगितले होते. आता शिल्पाला कलर्स चॅनलकडून रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' ची ऑफर मिळाली होती, मात्र तिने करण्यास नकार दिला.  याविषयी शिल्पाने सांगितले, 'माझ्यासाठी 'खतरों के खिलाडी'चा अर्थ फक्त अक्षय कुमार आहेत. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. आता या शोमध्ये अक्षय नाहीत त्यामुळे मी हा शो करणार नाही. आता मी टीव्ही शोदेखील करू इच्छित नाही. कारण छोट्या पडद्यावरील लोकांचे विचारही छोटे असतात. आज मी खूप मेहनत घेऊन शिल्पा शिंदे झाली आहे. मला आता भारती सिंह आणि मनीष पॉल सारखी अँकरिंग करण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच करेन.' 

 

चाहत्यांकडून मिळणा-या गिफ्ट्ससाठी आता घ्यावे लागणार दुसरे घर... 
शिल्पा शिंदेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस 11'चा विजेता बनवण्यात तिच्या चाहत्यांनी कोणतीच कमी सोडली नाही. चाहत्यांचे प्रेम पाहून शिल्पा म्हणाली, 'चाहत्यांचे प्रेम पाहून माझा एखादा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाल्याचे मला वाटत आहे. शाहरुख, सलमान किंवा आमिर खान यांच्यासारखे लोक मला मान देत आहेत. नुकतेच मार्केटमध्ये गेले होते तेव्हा एका मुलीचा अपघात होणार होता, सुदैवाने ती वाचली. आता बाजारात तोंडाला स्कार्फ बांधून जावे का, असा विचार मी करत आहे. गिफ्टदेखील इतके मिळत आहेत की, ते ठेवण्यासाठी मला आता दुसरे घर घ्यावे लागेल, असे वाटत आहे.' 

 

विकास गुप्तासोबत कधीच काम करणार नाही... 
शोमध्ये तिचा स्पर्धक राहिलेल्या विकास गुप्तासोबत तिचे नाव जोडले गेले, यावर शिल्पा म्हणाली, 'मी त्यांच्यासोबत पुन्हा कधीच दिसणार नाही. काही गोष्टी मला बाहेर आल्यानंतर कळाल्या, काही मी स्वत: पाहिल्या. त्यानंतर आता त्यांच्यासोबत मी कधीच काम करू शकणार नाही. नेहमीच माझे नाव त्यांच्यासोबत जोडले जाते. अशा बातम्यांचा मला खूप राग येतो.'


पुढील स्लाईड्सवर बघा, शिल्पाच्या नवीन फोटोशूटची खास झलक....  

बातम्या आणखी आहेत...