आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Insta Post: मुलगी पलकच्या डेब्यू विषयी बोलली श्वेता तिवारी, लिहिले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक सध्या बॉलिवूड डेब्यू करणार नाही. हे स्वतः श्वेता तिवारीने स्पष्ट केले आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिची मुलगी पलक सध्या चित्रपटांमध्ये डेब्यू करणार नाही. पलक पहिले आपले शिक्षण पुर्ण करणार आहे. तिच्या 12 वी क्लासचे शिक्षण सुरु झाले आहे. दिर्घकाळापासून अंदाज वर्तवले जात होते की, पलक डेब्यू करणार आहे. 'तारे जमीन पर' फेम अॅक्टर दर्शील सफारीसोबत 'क्विकी' नावाच्या चित्रपटातून डेब्यू करणार अशा चर्चा होत्या. पलक ही श्वेता तिवारीचा पहिला नवरा राजा चौधरीची मुलगी आहे.


श्वेताने इंस्टाग्रामवर असे लिहिले
श्वेताने इंस्टावर लिहिले की, पकल 'क्विकी' चित्रपटातून डेब्यू करणार हा प्रश्न मला गेल्या काही महिन्यांपासून विचारला जात आहे. पलकने 'क्विकी' चित्रपटातून सुरुवात करावी अशी आमचीही इच्छा होती. परंतू ही प्रोसेस खुप दिर्घ होती. आता पलकचे 12वीचे क्लास सुरु झाले आहे. यामुळे आम्ही आम्ही निर्णय घेतला आहे की, या पलक या प्रोजेक्टपासून दूर राहिल. पलकचे शिक्षण जास्त महत्त्वाचे आहे. आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला याचे दुःख आहे. परंतू मी विश्वासाने सांगते की, पलक लवकरच डेब्यू करेल.


17 वर्षांची आहे पलक 
17 वर्षांच्या पलकचा जन्म 8 ऑक्टोबर, 2000 मध्ये झाला होता. पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. श्वेताने 1998 मध्ये राजासोबत लग्न केले होते. परंतू ते वेगळे झाले. यानंतर श्वेताने टीव्ही अॅक्टर अभिनव कोहलीसोबत 2013 मध्ये दूसरे लग्न केले. श्वेता आणि अभिनव यांना दिड वर्षांचा मुलगा आहे. त्याचे नाव रेयांश आहे. पलक सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह राहते. तिने 2018 मध्ये एक फोटोशूटही केले होते.
 

 

बातम्या आणखी आहेत...