आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

37 वर्षांच्या श्वेता तिवारीने हा फोटो शेअर करताच, लोकांनी केली अशी मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारी लंडनमध्ये व्हॅकेशनवर होती. तिने आपले व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये ती मुलगी पलक आणि मुलगा रेयांशसोबत दिसत होती. आता ती मुंबईत परतली आहे. परत येताच तिने एक फोटोशूट केले, याचे काही फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले.
- यामध्ये ती स्लीवलेस कॉटन ड्रेसमध्ये एकदम सिंपल आणि सुंदर दिसतेय. श्वेताने हा फोटो शेअर करताच फॅन्सने यावर कमेंट करणे सुरु केले. फॅन्सने तिच्या लूकची प्रशंसा केली आणि तिला टीव्हीवर परतण्याची मागणी केली. 


- नोव्हेंबर 2016 मध्ये श्वेता 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा आई बनली होती. तिने मुलगा रेयांशला जन्म दिला होता. 37 वर्षांची श्वेता सध्या कोणत्याच मालिकेत काम करत नाही. ती आपल्या मुलाच्या संगोपनात व्यस्त आहे. श्वेता शेवटच्यावेळी 'बेगुसराय' (2016) या टीव्हीशोमध्ये दिसली होती.

 

श्वेताने केलेय दोन लग्न
- वयाच्या 21 व्या वर्षी श्वेता पहिल्यांदा आई बनली होती. पहिला नवरा राजा चौधरीची त्याला 16 वर्षांची मुलगी आहे, तिचे नाव पलक आहे.
- 2007 मध्ये श्वेताने राजासोबतचे 9 वर्षांचे नाते संपवले होते.
- यानंतर श्वेताने अभिनव कोहलीला 3 वर्ष डेट केल्यानंतर 2013 मध्ये त्याच्यासोबत लग्न केले. रेयांश हा अभिनव आणि श्वेताचे पहिले मुल आहे.
- श्वेताने टीव्ही सीरियल 'कसौटी जिंदगी की' मध्ये केलेल्या प्रेरणा या व्यक्ती रेखेमुळे ओळखले जाते. तिने 'नागिन', 'सजन रे झूठ मत बोलो', 'परवरिश आणि 'बालवीर'  सारख्या मालिकांमध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फॅन्सने केलेल्या कमेंट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...