आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या 'सेल्फी मौसी'चे गर्लफ्रेंडसोबत झाले पॅचअप, आईमुळे तुटले होते नाते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्हीच्या 'सेल्फी मौसी'च्या नावाने प्रसिध्द असलेला सिध्दार्थ 25 वर्षांचा झाला आहे. 15 जून, 1993 मध्ये दिल्ली येथे जन्मलेला सिध्दार्थ कॉमेडी शोमधून टीव्हीवर कमबॅक करतोय. वाढदिवशी सिध्दार्थचे त्याची गर्लफ्रेंड सुरभी जोशीसोबत पॅचअप झाले. सिध्दार्थच्या आईमुळे 2 वर्षांपुर्वी त्यांचे नाते तुटले होते. 


एकत्र काम करताना झाले होते प्रेम
- कॉमेडी क्लासेस या टीव्ही शोमध्ये काम करता-करता त्यांना प्रेम झाले होते. नंतर त्यांचे प्रेमप्रकरण चालले. परंतू सिध्दार्थच्या आईमुळे दोघं वेगळे झाले.
- सुरभीने आपल्या इंस्टाग्रामवर सिध्दार्थच्या वाढदिवसाचे काही फोटोज पोस्ट करत त्याला विश केले. एका फोटोवर सिरभीने, 'People who are meant to be together find their way back. They may take a few detours, but they are never lost. HAPPY BIRTHDAY SIDDY BOY. Welcome Home ❤️💃🏻🎉🎂'. असे लिहिले. 
- सिध्दार्थनेही सुरभीसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिले की, 'Im so happy to come back to you...thankyou @subuhijoshi_essjaydarling..😎'.

 

वाईट प्रसंगातून गेला आहे सिध्दार्थ
वाईट प्रसंगातून गेल्यानंतर सिध्दार्थला पुन्हा कॉमेडी शोमध्ये एंट्री मिळाली.रिपोर्टनुसार तो लवकरच सुरु होणा-या कॉमेडी सर्कमध्ये दिसणार आहे. सिध्दार्थ गायब असल्याची माहिती त्याच्या एका मित्राने फेसबुकवर दिली होती. याचवर्षी एप्रिलमध्ये सिध्दार्थने तो सुरक्षित असल्याची माहिती इंस्टाग्रामवर दिली होती. सिध्दार्थने मीडियाला सांगितले होते की, पालक त्याला जेवणातून ड्रग्स देत होते. सिध्दार्थने मीडियाला सांगितले होते की, ड्रग्समुळे त्याची परिस्थिती खुप वाईट झाली होती. त्याला रिहॅब सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. सेंटरमध्ये त्याला खुप टॉर्चर केले जात होते. त्याच्या मॅनेजरने एक महिना मेहनत घेऊन त्याला सेंटरमधून बाहेर काढले होते. तो म्हणाला होता की, मला घरातल्या लोकांनी किडनॅप केले आणि पागलखाण्यात टाकले होते.

बातम्या आणखी आहेत...