आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोफियाने शेअर केला फोटो, म्हणाली - बाळ गमावल्यानंतर अशी झाली शरीराची अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस 8'मध्ये स्पर्धक म्हणून झळकलेली सोफिया हयात तिचा नवरा व्लाद स्टॅन्श्यूपासून विभक्त झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचकाळात सोफियाने तिचे बाळ गमावल्याचेही म्हटले गेले होते. आता स्वतः सोफियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून गर्भपाताचे दुःख व्यक्त केले आहे. तिने एक फोटो शेअर करुन गर्भपातानंतर तिचे शरीर पुर्वीसारखे राहिले नसल्याचे सांगितले आहे. 


ही आहे सोफियाची पोस्ट...
- सोफियाने लिहिले, "मिसकॅरेजनंतर आता माझे शरीर असे दिसत आहे. माझे माझ्या शरीरावर खूप प्रेम आहे. बाळाची चाहुल लागल्यापासून आणि ते गमावल्यानंतर आता शरीराचा शेप बेढप झाला आहे. मी अशी पुर्वी कधीच नव्हते. बाळ गमावल्यानंतर माझे शरीर असे झाले आहे. पण आताही माझे माझ्या शरीरावर पुर्वीइतकेच प्रेम आहे. कारण माझ्या शरीराने प्रत्येक दिवशी मला बरेच काही दिले आहे." सोफियाने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये तिचे पोट सुटलेले दिसत आहे.


नवरा सैतान असल्याचे सांगून त्याला हाकलले घराबाहेर...
- बोल्ड अंदाज आणि स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या सोफियाने नव-यासोबतचे सगळे संबंध संपुष्टात आणल्याचे एप्रिल महिन्यात इंस्टाग्राम अकाउंटवरुन जाहिर केले होते. शिवाय तिने नव-याचा उल्लेख सैतान आणि चोर असा केला होता.
- सोफियाने गेल्यावर्षी मार्च महिन्यात व्लाद स्टॅन्श्यूसोबत लग्न केले होते. व्लादचे हे दुसरे तर सोफियाचे पहिले लग्न होते. पहिल्या लग्नापासून व्लादला एक मुलगादेखील आहे. 
- एका एन्टरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सोफियाने सांगितले होते, की ती प्रेग्नेंट होती, पण तिला तिचे बाळ गमवावे लागले. 


पुढे वाचा,  सोफियाने सांगितले, नवरा होता खोटारडा... 

बातम्या आणखी आहेत...