आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Dr. Hathi'च्या मृत्यूविषयी डॉक्टरांचे वक्तव्य, थोडावेळापुर्वी दवाखाण्यात आणले असते तर वाचले असते प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे डॉ. हाथी म्हणजे कवी कुमार आजाद यांच्या निधनाविषयी डॉक्टर्सने एक चकीत करणारे वक्तव्य केले आहे. डॉक्टर्स म्हणतात की, त्यांना थोडावेळापुर्वी हॉस्पिटलमध्ये आणले असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. कवी कुमार यांचे 9 जुलै रोजी हार्ट अटॅकने निधन झाले होते. त्यांना मुंबईच्या वोक हार्ट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. 

 

हॉस्पिटलमध्ये कृत्रिमपध्दतीने श्वास देण्याचा केला प्रयत्न
- एका वेब साइटने वोक हार्ट हॉस्पिटलचे डॉ. रवी हिरावनी यांचा दाखला देऊन लिहिले आहे की, कवी कुमार यांना दुपारी जवळपास 12.10 मिनिटांनी दवाखाण्यात आणण्यात आले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा त्यांचे ठोके सुरु होते. त्यांना तात्काळ एमरजेंसी वार्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना सीपीआर (कृत्रीम श्वास) देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू येथे आणता आणता त्यांचा ECG एकदम फ्लॅट झाला होता. याच कारणामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले. म्हणजे जर डॉ. हाथी यांना काही वेळापुर्वी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. 


कवी यांना श्वास घेण्यास व्हायचा त्रास
- आजाद यांच्या भावाने सांगितले की, गेल्या 3-4 दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास खुप त्रास होत होता.
- यासोबतच कवी हे हायपरटेंशन आणि रात्री झोपेत श्वास रोखण्यासारख्या समस्येमुळे त्रस्त होते. याच कारणामुळे ते लोकल चेस्ट फिजिशनच्या देखरेखीमध्ये होते.

तब्येत बिघडल्यावर शूटिंग सेटवरून निघून आले होते कवी
- शोचे प्रोड्यूसर असित कुमार मोदीनेही कवी यांच्या बिघडलेल्या तब्येतीविषयी खुलासे केले आहेत. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून डॉ. हाथींची तब्येत ठिक नव्हते. ते एकदा शूटिंगवरुन लवकर निघून गेले होते. 
- मोदी म्हणाले की, "ते 2009 मध्ये खुप आजारी पडले होते. परंतू यानंतर ते हेल्दी आणि आनंदी राहत होते. ते सेटवर प्रत्येकाला हसवायचे."


7 वर्षांपुर्वी झाले होते कवी कुमार यांचे ऑपरेशन

- मुंबईच्या सैफी हॉस्पिटलचे प्रसिध्द सर्जन डॉ. मुफजल लकडावालाने 7 वर्षांपुर्वी डॉ. हाथीचे ऑपरेशन केले होते. डॉ. हाथी हे लठ्ठपणाचा सामना करुनही हसत राहायचे, असे म्हणत डॉक्टर त्यांची आठवण काढतात. 
- डॉक्टर म्हणाले की, "डॉ. हाथी मला एकदा म्हणाले होते की, माझ्या कामासाठी मला लठ्ठ राहणे गरजेचे आहे. परंतू त्यांना माहिती होते की, हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे. 7 वर्षांपुर्वी आम्ही त्यांना वाचवले होते. त्यावेळी त्यांचे वजन जवळपास 254 किलो होते."

बातम्या आणखी आहेत...