आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टिंगसाठी घरातून पळाले होते हंसराज, तारक मेहताने दिली ओळख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: प्रसिध्द टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा...' तील हंसराज हाथीची भूमिका साकारणारा कलाकार कवी आझाद यांचे निधन झाले. हार्ट अटॅकमुळे त्यांनी वयाच्या 45 वर्षी जगाचा निरोप घेतला. आपल्या शानदार कॉमिक टायमिंगमुळे ते घराघरात प्रसिध्द झाले होते. त्यांच्या आकस्मित निधनाने संपुर्ण टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. बिहार येथे राहणा-या रवि कुमारला नेहमीच स्क्रिनवर दिसायचे होते. 


कमी वयात आले होते मुंबईत
- ते कमी वयातच घरसोडून मुंबईला आले होते. परंतू त्यांना 'तारक मेहता...' या मालिकेतून ओळख मिळाली. 
- सब टीव्हीचा 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो 28 जुलै 2008ला सुरु झाला होता. ते सुरुवातीपासून या मालिकेत होते. या मालिकेत ते हंसराज हाथीच्या भूमिकेत दिसले. 
- कवि कुमार आझाद यांची भूमिका लहान मुलांमध्ये खुप प्रसिध्द झाली. शोमध्ये गोकुल धाम सोसायटीमध्ये त्यांच्या शांत स्वभावाने लोकांची मन जिंकली. 
- टीव्हीसोबतच ते 2000 मध्ये आलेल्या 'मेला' या बॉलिवूड चित्रपटात दिसले होते.
- गेल्या काही काळापासून ते आपल्या वाढत्या वजनामुळे त्रस्त होते. ते टायट चार्ट फॉलो करत होते. 
- मीडिया रिपोर्टनुसार त्यांना 2010 मध्ये आपले 80 किलो वजन सर्जरीच्या माध्यमातून कमी केले होते. यामुळे त्यांना रोजच्या जीवनात वावरणे सोपे झाले होते. 
- वेळ मिळाल्यावर ते कविता लिहित होते. 

बातम्या आणखी आहेत...