आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्यांची झाली 'तारक मेहता' च्या दया भाभीची मुलगी, मुलीसोबत घेतले बालाजीचे दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'तारक मेहताका उल्टा चश्मा' ची दया भाभी म्हणजेच दिशा वाकाणी सध्या मॅटरनिटी फेज एन्जॉय करतेय. अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर असलेली दिशा आपल्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. तिने आपली मुलगी स्तूती पंडियासोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती मुलीला कडेवर घेऊन पती मयूर पांडियासोबत दिसतेय. दया आपल्या मुलीला पतीसोबत तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेली होती. तिने हा फोटो शेअर करत त्याला "May god bless our child and protects her from every obstacle" असे कॅप्शन दिले आहे. 


6 महिन्याची झाली दिशाची मुलगी
- दिशाने 28 नोव्हेंबर 2017 मध्ये मुलीला जन्म दिला होता. तिचे वडील भीम वाकाणीने ही बातमी कन्फर्म करत सांगितले की, दिशाने नॉर्मल डिलिवरीने मुलीला जन्म दिला.
- दिशाचे हे पहिले मुलं आहे. तिने 24 नोब्हेंबर 2015 ला मयूर पंडियासोबत लग्न केले होते. मयूर अॅक्टिंग वर्ल्डमधून नाही. तो मुंबईमध्ये चार्टर्ड अकाउंटेंट आहे.


9 वर्षांपासून 'तारक मेहता...' शी जोडली आहे दिशा
- दिशाचा जन्म 17 सप्टेंबर 1978 ला अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला होता. परंतू भावनगरमध्ये तिचे बालपण गेले.
- ती शाळेत शिक्षण घ्यायची तेव्हापासून अॅक्टिंगशी जोडली गेली आहे. तिने गुजरात कॉलेज, अहमदाबादमधून ड्रामोसिक आर्ट्समध्ये ग्रॅज्यूएशन केले आहे. दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मे काम करत आहे. 


या शोजमध्ये केले आहे काम
- दिशाने  'खिचड़ी' (2004) आणि 'इंस्टेंट खिचड़ी' (2005 ) मध्ये काम केले आहे.
- यासोबतच दिशाने बॉलिवूडच्या 'कमसिन : द अनटच्ड' (1997), 'फूल और आग' (1999), 'देवदास' (2002), 'मंगल पांडे : द राइजिंग' (2005), 'सी कंपनी' (2008) और 'जोधा अकबर' (2008)  सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिशा वाकाणीचे नव-यासोबतचे निवडक PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...