आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Tappu'ने आपल्या 'हाथी अंकल'साठी लिहिली इमोशनल पोस्ट, लिहिले - मी असेच तुला जवळ ठेवेल, तु आरामात झोप'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या डॉ. हंसराज हाथी म्हणजेच कवी कुमार आजाद यांच्या निधनाने शोमधील सोबतचे कलाकार स्तब्ध आहेत. आजाद हे शोमधील 'पुरुष मंडळ'चे आवडते होते. यासोबतच ते 'टप्पू सेना'चेही आवडते अंकल होते. शोमध्ये 'गोकुलधाम सोसायटी'च्या मुलांसोबत ते नेहमीच खेळताना दिसत होते. त्यांच्या अचानक जाण्याने टप्पूची भूमिका केलेल्या भव्य गांधीने एक इमोशनल फोटो शेअर केला आहे.


फोटोमध्ये आजाद यांनी भव्यला जवळ घेतले आहे. भव्यने या फोटोला "मी असेच तुला जवळ ठेवेले... तु आरामात झोप"(I will hold on to this hug... sleep in ease.) असे कॅप्शन दिले आहे. आजाद यांचे सोमवारी हार्ट अटॅकने निधन झाले.

 

2017 मध्ये भव्यने सोडला शो 
- भव्य गांधी 2008 पासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये काम करत होता. तो जेठालाल आणि दयाबेनचा मुलगा टप्पूची भूमिका साकारत होता. यानंतर 2009 मध्ये आजाद यांनी शो जॉइन केला होता. 9 वर्षे सतत हा शो केल्यानंतर भव्यने फेब्रुवारी 2017 मध्ये हा शो सोडला होता. त्याने हा निर्णय गुजराती चित्रपट  'Pappa Tamne Nahi Samjaay' साठी घेतला होता. लीड अॅक्टर म्हणून हा त्याचा पहिला चित्रपट होता. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या तो स्टेज शो करण्यात व्यस्त आहे. 'तारक मेहता...'मध्ये आता त्याची जागा राज अंदकतने घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...