आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः भारतीय सिनेसृष्टीत बी. आर. चोप्रा यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक आणि कौटुंबिक मुद्यांवर आधारित अगदी स्वच्छ सिनेमे बनवले. 22 एप्रिल 1914 रोजी लुधियानामध्ये जन्मलेले बी. आर. चोप्रा यांनी एक ओर नया दौर, वक्त, हमराज, कानून, गुमराह, इंसाफ का तराजू, निकाह, बाबुल आणि बागवान हे अविस्मरणीय सिनेमे बनवले. तर दुसरीकडे 'महाभारत' या मेगा मालिकेसाठी त्यांना ओळखले जाते. ही मालिका दूरदर्शनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मालिका ठरली. बी. आर. चोप्रा यांचे पूत्र रवी चोप्रा यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते.
'महाभारत' बघण्यासाठी नाहीशी व्हायची रस्त्यांवरची गर्दी...
2 ऑक्टोबर 1988 रोजी बी.आर.चोप्रा यांनी टीव्हीवर 'महाभारत' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. ही मालिका बघण्यासाठी प्रेक्षक दर रविवारी सकाळी नऊ वाजता टीव्हीसमोर बसायचे. ज्यांच्या घरी टेलिव्हिजन सेट नव्हता, ते लोक शेजा-यांच्या घरी जाऊन ही मालिका बघायचे. या मालिकेची नोंद गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. 24 जून 1990 या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
आज ही मालिका ऑफ एअर होऊन 28 वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र आजही मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या 28 वर्षांत मालिकेतील स्टारकास्टच्या लूकमध्ये बराच बदल झालेला दिसून येतो. Divyamarathi.com तुम्हाला महाभारतातील प्रसिद्ध कलाकारांच्या चेह-यात झालेला बदल छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे.
खरे नावः किरण जुनेजा
भूमिकेचे नावः गंगा
अभिनेत्री किरण जुनेजा यांनी महाभारतात गंगा हे पात्र साकारले होते. टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा असलेल्या या अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पीसोबत लग्न केले आहे. सिनेमांमध्ये त्या चरित्र भूमिका वठवत असून आजही त्या इंडस्ट्रीत अॅक्टिव आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या महाभारतातील इतर कलाकारांविषयी...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.