आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'तू आशिकी' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री जन्नत जुबैर रहमानी सध्या चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, जन्नतला मालिकेच्या निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याचे कारण म्हणजे, जन्नतने मालिकेत तिच्या कोस्टारला किस करु नये, हे तिच्या आईवडिलांचे मत आहे. पण निर्मात्यांना मात्र जन्नत आणि तिचा को-स्टार रित्विक यांच्यावर एक किसींग सीन चित्रीत करायचा होता. पण जन्नतच्या आईने यावर आक्षेप नोंदवल्याने तिला आता शोबाहेर करण्यात आले आहे. या मालिकेत जन्नत पंक्तिच्या भूमिकेत झळकत होती. तर अहानच्या भूमिकेत अभिनेता रित्विक अरोरा आहे.
आता या फिल्ममध्ये झळकणार आहे जन्नत...
आता जन्नत 'तू आशिकी' या मालिकेत झळकणार नाही. पण तिला आता प्रेक्षक मोठ्या पडद्यावर बघू शकणार आहेत. राणी मुखर्जी स्टारर 'हिचकी' या चित्रपटात जन्नत झळकणार आहे. जन्नत आता 16 वर्षांची आहे. या वयात तिने पडद्यावर किसींग सीन देऊ नये, असे तिच्या आईचे मत आहे. 'फुलवा' या मालिकेतून जन्नतला लोकप्रियता मिळाली आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, जन्नतचे फोटोज..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.