आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षीय अभिनेत्रीकडे झाली किसींग सीनची मागणी, आईचा चढला पारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'तू आशिकी' ही टीव्ही मालिका सध्या गाजत आहे. या मालिकेत पंक्तीची भूमिका अभिनेत्री जन्नत जुबैर रहमानी आणि अहान ही व्यक्तिरेखा अभिनेता रित्विक अरोरा साकारत आहेत. या मालिकेत अहान पंक्तीला तिचे गायिका होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतोय. या मालिकेच्या निर्मात्यांनी अभिनेत्री जन्नतकडे अशी एक मागणी केली, ज्यामुळे तिची आई चांगलीच भडकली आहे. 


जन्नतकडे केली किसींग सीनची मागणी... 
बातम्यांनुसार, मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक पंक्ती आणि अहान यांच्यात एका किसींग सीनची प्लानिंग करत होते. जन्नतच्या आईला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्या चांगल्याच वैतागल्या. त्यांनी जन्नत मालिकेत किसींग सीन देणार नसल्याचे निर्मात्यांना ठणकावून सांगितले आहे. यावरुन जन्नतची आई आणि निर्मात्यांमध्ये वाददेखील झाला. जन्नत आता 16 वर्षांची आहे. या वयात तिने किसींग किंवा बोल्ड सीन्स करु नये, असे तिच्या आईचे मत आहे. जन्नतच्या आईने ही मालिका साइन करतानाच शोमध्ये नो किसींग क्लॉज टाकला होता. जन्नतने यापूर्वी 'फुलवा' या मालिकेत काम केले होते. या मालिकेतूनच तिला लोकप्रियता मिळाली. 


पुढील स्लाईड्सवर बघा, जन्नतचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...