आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 42व्या वर्षी अविवाहीत आहे हा टीव्ही अभिनेता, शोमध्ये म्हटला 'गर्लफ्रेंडला चीट केले आणि बर्बाद झालो'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'तनु वेड् मनु', 'शोरगुल' यांसारखे चित्रपट आणि 'काव्यांजलि','पुर्नविवाह' यांसारख्या शोमध्ये अभिनेता म्हणून झळकलेला एजाज खानचा एक व्हिडिओ सोशल साईटवर व्हायरल होत आहे. गर्लफ्रेंड्सवरुन नेहमी चर्चेत राहणारा 42 वर्षाचा एजाज खान अजूनही सिंगल आहे आणि व्हिडिओमध्ये एजाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना फारच भावूक   झाला.  एजाजने आतापर्यंत अनीता हसनंदानी, इटेलियन-कनेडियन सिंगर नताली डी आणि निधी कश्यपला डेट केले आहे. एजाज चॅट शो जज्बात येथे आला तेव्हा त्याला गर्लफ्रेंडच्या आठवणीने रडू कोसळले. एक्स गर्लफ्रेंडच्या आठवणीत रडला एजाज...

 

- या शोचा अजून एकही एपिसोड टेलिकास्ट झाला नाही फक्त याचा प्रोमो समोर आला आहे ज्यात एजाज राजीव खंडेलवालसोबत बोलताना दिसत आहे.
- या प्रोमोमध्ये एजाजने सांगितले की त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला चीट केले आहे.
- एजाजने सांगितले की, ही पहिलीच वेळ होती जेव्हा मी गर्लफ्रेंडला चीट केले. माझ्या एका चुकीने मला जन्मभराचा त्रास सोसावा लागला. ती गर्लफ्रेंड कोण याविषयी एजाजने सांगितले नाही.
 
गर्लफ्रेंडने लावला रेपचा आरोप..
- एजाज अभिनेत्री निधी कश्यपसोबतही रिलेशनशीपमध्ये होता. विशेष म्हणजे की निधीने त्याच्यावर रेपचा आरोप लावला होता. त्यामुळे निधी-एजाजचे रिलेशनशीप चर्चेत राहिले. पण 2011 साली निधीने तक्रार परत घेतली.

 

6 वर्षाने लहान अभिनेत्रीला केले आहे डेट..
- निधीशिवाय एजाजने 6 वर्षाने लहान अनिता हंसनंदानीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. दोघांचे 2010 साली ब्रेकअप झाले.
- एजाजच्या ब्रेकअपचे कारण कॅनेडियन सिंगर नताली डी सांगितली जाते जिच्यासोबत त्याचे अफेअर सुरु होते. पण आता नतालीसोबतही त्याचे ब्रेकअप झाले आहे आणि नताली आता रघुरामला डेट करत आहे.
- एजाजने त्याच्या टीव्ही करिअरची सुरुवात 2003 साली 'कहीं तो होगा'मधून केली होती. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, एजाज खानचे एक्स गर्लफ्रेंड नतालीसोबतचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...