आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीमुळे होऊ शकले नव्हते या टीव्ही कपलचे लग्न, १६ महिन्यानंतर अडकले विवाहबंधनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'पवित्र रिश्ता'(2012-13) फेम शक्ति अरोराने त्याची लाँगटाईम गर्लफ्रेंड नेहा सक्सेनासोबत लव्हमॅरेज केले आहे. मंगळवारी त्याने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत ही माहिती दिली. फोटोमध्ये शक्ती आणि नेहा मरुन आणि गोल्डन रंगाच्या मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसत आहेत. शक्तीने फोटोला कॅप्शन दिले आहे, "Together is a wonderful place to be!" 6 एप्रिलला झाले लग्न..


- शक्ती आणि नेहा यांनी एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये 6 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शक्तीने सांगितले की त्याचे लग्न फार घाईघाईत झाले. सकाळी हळद आणि रात्री लग्न पार पडले. काही मोजक्या फॅमिली मेंबर्सच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले. 
- 2017 साली शक्ती आणि नेहा यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. याचे कारण शक्तीचे इंडोनेशियन सिंगर जसकीय गोटिक (Zaskia Gotik)सोबत असलेली जवळीक सांगण्यात येत होती. 
- त्यावेळी शक्तीने या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगितले होते आणि त्यामुळे त्यांचे नाते तुटता तुटता वाचले होते. दोघांनी 2014 साली लग्न केले. 

 

नोटबंदीमुळे टळले होते लग्न..
- नोव्हेंबर 2016 साली शक्ती आणि नेहा यांच्या लग्नाची डेट फिक्स झाली होती  पण अचानक झालेल्या नोटबंदीमुळे हे लग्न लांबणीवर पडले. 
- लग्न लांबणीवर पडल्यानंतर १६ महिन्यांनी या दोघांनी आता लग्न केले आहे. 

 

या शोमध्ये नेहाने केले आहे काम..
नेहाने 2009 साली 'सजन घर जाना है' या मालिकेतून डेब्यू केला होता. त्यानंतर तिने 'तेरे लिए'(2010), 'अमिता की अमित'(2013) आणि 'नच बलिए'(2015) मध्येही सहभाग घेतला होता. 


या शोमध्ये केले आहे शक्तीने काम..
शक्तीने 2006 साली  'शश्श्श... फिर कोई है'मधून टीव्ही करिअरची सुरुवात केली होती.
- त्यानंतर शक्तीने 'लेफ्ट राइट लेफ्ट'(2006), 'दिल मिल गए'(2007), 'बा बहू और बेबी'(2009), 'तेरे लिए'(2010), 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो'(2011), 'संस्कार लक्ष्मी'(2011), 'पवित्र रिश्ता'(2012), 'गुमराह'(2012), 'कसम प्यार की'(2016) यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा नेहा आणि शक्ती यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...