आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'CID'ची अभिनेत्री जसवीरच्या आईचा मृत्यू, 13 दिवसांपुर्वी मुलीच्या जन्माने घरात आला होता आनंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'CID', 'ससुराल सिमर का, 'वाकीस' आणि 'हिटलर दीदी' सारख्या शोजमध्ये काम केलेली अभिनेत्री जसवीर कौरच्या आईचा मृत्यू झाला आहे. जसवीरची आई चरनजीत कौर या दिर्घकाळापासून आजारी होत्या. स्वतः जसवीरने इंस्टाग्रामवर आईच्या मृत्यूची माहिती शेअर केली आहे. जसवीरने 13 जून रोजी हॉस्पिटलमध्ये आईचा वाढदिवस साजरा केला. याचे फोटोज तिने इंस्टावर शेअर करत तिने "please get well soon" असे लिहिले होते. 


- जसवीरने 26 जून रोजी एस एल रहेजा हॉस्पिटलमध्ये पहिल्या बाळाला जन्म दिला. तिने मुलीचे नाव नायरा ठेवले आहे.
- तिची मुलगी फक्त 13 दिवसांची आहे. जसवीरने मुलीचे काही फर्स्ट फोटोज शेअर केले होते. यामध्ये तिचे पती विशाल मदलानीने मुलीगा कडेवर घेतलेले दिसत होते.

 

बिझनेसमनसोबत झाले जसवीरचे दुसरे लग्न...
- जसवीरचे पहिले लग्न 2006 मध्ये अजीज नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. पण दोन वर्षांतच हे लग्न मोडले आणि त्यांचा घटस्फोट झाला. 
- त्यानंतर मुंबई बेस्ड बिझनेसमन विशाल मदलानीला दोन वर्षे डेट केल्यानंतर 28 फेब्रुवारी 2016 रोजी जसवीरने त्याच्यासोबत साखरपुडा केला.
- 6 मार्च 2016 रोजी जसवीरने विशालसोबत दुसरे लग्न केले. या लग्नात टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.


'मोहब्बतें'मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती जसवीर...
- जसवीरने 'हिटलर दीदी' या मालिकेतील लीड कॅरेक्टर इंदु उर्फ इंदिरा शर्मा (रति पांडे) ची वहिनी सविता शर्माची भूमिका वठवली होती. 
- याशिवाय ती 'घर की लक्ष्मी बेटियां', जय वीरू', 'कृष्ण कन्हैया' आणि 'इश्क का रंग सफेद' या मालिकांमध्ये झळकली आहे.
- इतकेच नाही तर जसवीरने शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय स्टारर 'मोहब्बतें' या चित्रपटात बॅकग्राउंड डान्सरच्या रुपातही काम केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...