आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ohh My God... जगन्नाथ यात्रेत TV अॅक्ट्रेससोबत छेडछाड, थोबाडीत मारण्याचाही झाला प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः 'एफआयआर' या टीव्ही शोमध्ये झळकलेली अभिनेत्री माहिका शर्मासोबत अलीकडेच एक धक्कादायक घटना घडली. याचा खुलासा स्वतः माहिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. जगन्नाथ यात्रेदरम्यान तिच्यासोबत छेडछाडीची घटना घडल्याचे समोर आले आहे. याविषयी माहिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले आहे. माहिकाने सांगितल्यानुसार, यात्रेत एका मुलांच्या टोळक्याने तिची छेड काढली होती. 

 

माहिकाने इंस्टाग्रामवर लिहिले, " त्याक्षणी काय घडले, हे मला कळत नाहीये, मी अजूनही कन्फ्यूज आहे. जर काम करणे गुन्हा आहे, तर सेक्सविषयी बोलणेदेखील क्राइम आहे. आपण माणूस आहोत. आपल्या सगळ्यांच्या इच्छा, क्रश, फँटसी आणि अपेक्षा असतात, हे खरंच नैसर्गिक आहे. सोशल मीडियावर कायम माझा छळ होत असतो. पण मी काहीच बोलत नाही. लोक वाईट फोटो काढतात, ते शेअर करतात, मला माझी किंमत विचारतात. पण मी स्वतःला कायम शांत ठेवले. पण जगन्नाथ यात्रेदरम्यान मी सकाळी आरतीला गेले असताना लोक माझी खिल्ली उडवू लागले. एकाने तर मला जोरात धक्का दिला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. मी तरीदेखील शांत राहिले. मला कुठलीच तक्रार करायची नाही. माझा जगन्नाथावर पूर्ण विश्वास आहे. ते लोकही जगन्नाथाचीच मुले आहेत, मीही त्यांचीच लेक आहे. मी सगळ्यांना माफ केले आहे. कारण आपण सगळे एक आहोत. देवा मला माफ करा, मी तुमच्या एवढ्या जवळ असूनदेखील तुमचे दर्शन घेऊ शकले नाही. मला आशीर्वाद द्या."

 

पुढे वाचा, मुलाखतीत या संपूर्ण घटनेविषयी काय म्हणाली माहिका...

बातम्या आणखी आहेत...