आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अॅक्ट्रेसने केले बिझनेसमॅनसोबत इंटरकास्ट मॅरेज, पाहा मेंदी-हळदी ते वेडिंगपर्यंचे Photo

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही अॅक्ट्रेस शमीन मन्नान हिने गेल्या आठवड्यात (3 डिसेंबर) होमटाऊन आसाममधील दिब्रुगड येथे बॉयफ्रेंड अतुल कुमारसोबत लग्न केले आहे. हा आंतरधर्मिय विवाह होता. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पद्धतीने लग्न विधी झाले. शमीन मुस्लिम फॅमिलीतून आहे तर अतुल हिंदू. लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहे. शमीन आणि अतुल गेल्या 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अतुल हा शमीनच्या कॉलेजमध्ये तिचा सीनियर होता. 
 
 काय करतो शमीनचा पती 
 - शमीनचा पती अतुल कुमार मुंबईमध्ये पोस्ट-प्रोडक्शन आणि व्हिज्यूअल इफेक्ट्स स्टुडिओ (VFX) चालवतो. तो मुळचा बिहारचा आहे. मात्र त्याचे शिक्षण दिल्लीत झाले. 
 - शमीन आणि अतुल यांची पहिली भेट बंगळुरु येथे झाली. दोघेही येथे इंजिनिअरिंग करत होते. 
 - शमीनच्या आई-वडिलांचेही इंटररिलिजन मॅरेज होते. तिचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. 
 - लग्नाच्याआधी शमीन आणि अतुलने प्री-वेडिंग फोटोशूट केले होते. याबद्दल शमीन सांगते की ही क्रिएटीव्ही आयडिया माझी होती, कारण मला फोटोग्राफी खूप आवडते. 


बनू तेरी दुल्हनमधून मिळाला ब्रेक 
 - जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर 2006 मध्ये झी टीव्हीच्या बनू तेरी दुल्हन शोमधून शमीनला ब्रेक मिळाला. यामध्ये तिने अदितीचा रोल प्ले केला होता. त्यानंतर 'मात-पिता के चरणों में स्वर्ग', संस्कार : धरोहर अपनों की, ये है आशिकी, प्यार तूने क्या किया आणि खिडकी सारख्या शोमध्ये काम केले. 
 - शमीनने 2016 मध्ये फिल्म 'लव्ह शगून'मध्येही काम केले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हळदीपासून हिंदू-मुस्लीम पद्धतीने झालेले लग्नाचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...