आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावर फोटो शेअर करुन फसली श्वेता तिवारीची मुलगी, ट्रोलर्सला दिले असे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या मुलांसोबत लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. याच वेळी तिची मुलगी पलक तिवारीने इंस्टाग्रामवर आपला क्लोजअप फोटो शेअर केला. हा फोटो पाहून वाटतेय की, तिने लिप सर्जरी केली आहे. तिचा हा फोटो पाहून अनेक यूजर्सने तिला ट्रोल करणे सुरु केले. अनेकांनी तिच्या ओठांची खिल्ली उडवली तर कुणी म्हणाले की, तु लिप सर्जरी केली आहे आणि वाईट दिसत आहे. एक म्हणाला की,  'hi...can I kiss your lippy pink lips? palak'. तर एकाने लिहिले की,  'Momos Wali ladki... Plz don't share photo like that'.

 

पलकने दिले असे उत्तर
- श्वेताची मुलगी पलकने यूजर्सला उत्तर देताना लिहिले की,  'I’m only 17, and not somebody who’s a supporter of changing myself based on what the world May or May not like. So no Ma’am, that’s a false accusation, and it’s because of such accusations that going under the knife is considered a trend, and is ultimately promoted . I’m not for it ma’am. Sorry to disappoint you, have good night and best wishes :)'.
- पलकने काही काळापुर्वी एक फोटोशूट केले होते. यामध्ये तिने वन शोल्ड टॉप आणि लेदर पँट घातलेली आहे. तिने केस ओपन ठेवले आहेत.
- पलक 'Quickie'चित्रपटातून 'तारे जमीन पर'  दर्शील सफारीसोबत डेब्यू करणार आहे. काही काळापुर्वी तिने सनी देओलचा मुलगा डेब्यू फिल्म  'पल-पल दिल के पास' साठीच्या ऑडिशनच्या ऑफरला नकार दिला होता.
- पलकने ब-याच काळापुर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, "मी या चित्रपटासाठी खुप एक्सायटेड आहे. हा माझा पहिला चित्रपट आहे यामुळे खुप प्रेशर आहे. या चित्रपटाचा अनुभव खुप चांगला असेल आणि लोकांना चित्रपट आवडेल अशी अपेक्षा करते. मला आशा आहे की, हा चित्रपट चांगला चालेल कारण पर्सनली मला स्क्रिप्ट खुप चांगली वाटली."
- विशेष म्हणजे पलक श्वेता आणि तिचा एक्स हसबंड राजा चौधरीची मुलगी आहे. राजासोबत डिवॉर्स घेतल्यानंतर श्वेताने 2013 मध्ये बिझनेसमन अभिनव कोहलीसोबत लग्न केले होते. आता त्यांना एक वर्षाचा मुलगा रेयान्श आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पलक तिवारीचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...