आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 10 वर्षानंतर घटस्फोट घेत आहेत हे टीव्ही कपल, कारण ऐकून व्हाल चकीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'कुमकुम' मालिकेतून फेवरेवट बहूपर्यंतचा प्रवास करणारी टीव्ही अभिनेत्री जूही परमारने तिच्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून जूही आणि तिचा पती सचिन श्रॉफ हे घटस्फोट घेणार अशा बातम्या येत होत्या पण आता अखेर जूहीने तिच्या घटस्फोटाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

 

अशी माहिती मिळते की जूही आणि तिचा पती टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफ येत्या 25 जून रोजी कायदेशीररित्या विभक्त होत आहेत. या दोघांनी 10 वर्षाहून जास्त संसार केला आहे. गेल्या एक वर्षापासून हे दोघे वेगळे राहत होते. त्यांनी बांद्रा फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि आता त्यांना 25 जून ही डेट मिळाली आहे. जूहीने खुलासा केला की तिच्यात आणि सचिनमध्ये गेल्या अनेक वर्षापासून गोष्टी सुरळीत नव्हत्या. खूप प्रयत्न करुनसुद्धा त्या दोघांचे एकमेकांसोबत जमले नाही.

 

2009 साली झाले होते दोघांचे लग्न..
जूही आणि सचिनने 2009 साली लग्न केले होते. लग्नाच्या दोन वर्षांनंतरच त्यांच्यात खटके उडू लागले होते. मुलगी समायराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांसोबत जूळवून घेण्याचा फार प्रयत्न केला पण तसे काही झाले नाही. एका मुलाखतीत सचिनने सांगितले होते की जूही फार रागीट आहे छोट्या छोट्या गोष्टीवर तिला राग येतो तर जूहीने सांगितले होते की सचिनला विसरायची सवय आहे जी तिला अजिबात आवडत नाही.

 

अशी झाली होती पहिली भेट..
जूही आणि सचिनची भेट एका शोच्या सेटवर झाली होती. तिथे त्या दोघांनी एकमेकासोबत प्रथम नंबर एक्सचेंज केला होता. त्यांनी काम केलेला शो कधी ऑनएअर झाला नाही. यानंतर दोघांमध्ये थोडे बोलणे सुरु झाले आणि एके दिवशी सचिनने अचानक जूहीला मुव्ही डेटवर चलण्यास विचारले तर जूहीसुद्धा तयार झाली. यावेळी सचिने तिला प्रपोज केले आणि लगेचच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. केवळ 5 महिन्यांच्या ओळखीतच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आता त्यांना 4 वर्षाची मुलगी आहे जिचे नाव समायरा आहे. 

 

जूही म्हणाली कधी प्रेमच झाले नाही..
जूहीने घटस्फोटावर बोलताना सांगितले की, जेव्हा सचिनने तिचा लग्नासाठी विचारले तेव्हा तिचे सचिनवर प्रेम नव्हते पणलग्नानंतर आपोआपच प्रेम होईल असे वाटले पण तसे काही झाले नाही आणि हेच घटस्फोटासाठी कारण ठरले.

 

जयपूर येथे झाले होते रॉयल लग्न..
2009 साली जूही परमार आणि सचिन श्रॉफ यांचे लग्न झाले होते. दोघांनी हा दिवस खास बनवण्यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न केले.दोघांनीही जयपूर येथे शानदार रॉयल वेडींग केले होते. त्यांचे लग्न अजूनही जयपूरच्या टॉप 50 लग्नांमध्ये गणली जाते. 14 फेब्रुवारीलाच दोघांचा साखरपुडा झाला होता. 

 

या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आल्या होत्या पण त्यावर दोघांनी मौन ठेवले होते. काही दिवसांपूर्वीच हे दोघे संतोषी माँ या मालिकेत सोबत दिसले होते. जूहीने फलदाता शनि' मालिकेत काम केले आहे तर सचिन श्रॉफही लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. जूही बिग बॉस 5ची विनरसुद्धा आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जूही परमार आणि सचिन श्रॉफचे काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...