आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : या 2 BHK फ्लॅटमध्ये राहते 'गोपी बहू', आतून दिसते असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : घरा-घरात 'गोपी बहू' च्या नावाने प्रसिध्द झालेली जिया मानेक 32 वर्षांची झाली आहे. ती ब-याच दिवसांपासून टीव्हीपासून दूर आहे. एप्रिल 2016 मध्ये तिने एका प्रसिध्द चॅनलमध्ये दावा केला होता की, ती पुन्हा 'साथ निभाना साथिया' मध्ये झळकणार आहे. परंतू असे काही झाले नाही. सुत्रांनुसार सध्या तिच्याकडे काहीच काम नाहीय. जिया मुंबईमधील मलाड येथील एका अपार्टमेंटमध्ये 16 व्या मजल्यावर राहते. ती 2 BHK फ्लॅटमध्ये राहते. 


5 वर्षांपुर्वी खरेदी केला होता फ्लॅट  
सुत्रांनुसार तिने 2013 मध्ये ड्रिम हाउस खरेदी केले होते. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, 
"पहिले मी मीरा रोडवर 1 BHK फ्लॅटमध्ये राहायचे. माझे एक स्वतःचे घर असावे अशी माझी खुप इच्छा होता." जियाने यावेळी सांगितले की, दोन बेडरुमपैकी एक बेडरुम माझी आणि एक माझ्या पालकांची आहे.

 

'जिनी और जूजू' मध्ये दिसली शेवटच्यावेळी
जिया 'साथ निभाना साथिया' मध्ये गोपी बहूची भूमिका साकारत असतानाच ती दुस-या चॅनलच्या डान्सिंग रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 5' मध्ये सहभागी झाली होती. याच कारणांमुळे तिला  'साथ निभाना साथिया' मधून काढून टाकण्यात आल्याच्या चर्चा होत्या. शेवटच्या वेळी ती कॉमेडी सीरियल 'जिनी और जूजू' मध्ये अली असगरसोबत दिसली होती. परंतू या शोमधूनही ती लवकरच बाहेर पडली.


या टीव्ही शोजमध्ये केलेय काम...
जिया मानेक ने 'न घर के न घाट के', यासोबतच  साथ निभाना साथिया, झलक दिखला जा 5, बालिका वधू, ना बोले तुम न मैंने कुछ कहा आणि बड़ी दूर से आए हैं सारख्या सीरियल्समध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जिया मानेकच्या घराचे काही PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...