आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअरसाठी आईने विकले होते दागिणे, अशी होती कपिल शर्माच्या 'बुआ'ची लाइफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही शो 'कॉमेडी नाइट विद कपिल' मध्ये कपिल शर्माच्या 'बुआ' च्या भूमिकेत दिसणारी उपासना सिंह सध्या अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर आहे. सध्या ती कोणत्याही टीव्ही शोमध्ये दिसत नाही. तिच्याविषयी काही गोष्टी खुप कमी लोकांना माहिती असतील. उपासना जेव्हा 17 वर्षांची होती तेव्हा तिला राजस्थानी चित्रपट 'बाई चली ससारिए' ची पहिल्यांचा ऑफर आली होती. हा चित्रपट हिट ठरला आणि याचे तिला फक्त 35000 रु. मिळाले होते. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला तिचे काही अनसीन फोटोज दाखवणार आहोत. आईने उपासनासाठी विकली होती ज्वेलरी...

 

- उपासनाचा जन्म होशियारपुर(पंजाब) च्या एका मध्यम वर्गीय कुटूंबात झाला.
- सुरुवातीला तिला डॉक्टर बनायचे होते. परंतू नंतर तिने ड्रामेटिक आर्टमध्ये एमए केले आणि मुंबईला आली.
- तिने अभिनेत्री व्हावे असे तिच्या वडिलांना कधीच वाटत नव्हते. परंतू उपासनाच्या आईने तिला खुप सपोर्ट केला.
- येवढेच नाही तर उपासनाच्या आईने तिला अभिनेत्री बनवण्यासाठी स्वतःची ज्वेलरी विकली होती.
- उपासनाने अॅक्टिंग करीअरमध्ये स्वतःचे नाव बदलून चिनमिन ठेवण्याचा प्लान केला होता. परंतू आईने स्पष्ट नकार दिला.

 

13 व्या वर्षी 50 वर्षांच्या पुरुषाची लव्हर बनली होती उपासना
- वयाच्या 13 व्या वर्षी उपासाने 'चित्रलेखा' या नाटकात काम केले होते. यामध्ये ती 50 वर्षाच्या व्यक्ती लव्हर बनली होती.
- तिने आतापर्यंत 100 चित्रपटांमध्ये काम केलेय. यामध्ये रीजनल चित्रपटांचाही समावेश आहे.
- उपासनाने आपल्या स्वतःच्या कमाईत मुंबईमध्ये एक लाख रुपयात 1(RK)खरेदी केले होते.

 

पाच वर्षांपासून नव-यापासून वेगळी राहते उपासना
- ऑक्टोबर 2016 मध्ये आलेल्या बातम्यांनुसार उपासना सिंह आणि हसबँड नीरज भारव्दाजच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या.
- असा दावा केल्या जातो की, 2009 मध्ये लग्नगाठीत अडकलेले हे जोडपे, आता कायदेशीररित्या वेगळे होणार आहेत.
- उपासना आणि नीरज पाच वर्षांपासून वेगळे राहत असले तरीही त्यांचे बोलणे होत असते. परंतू 2016 च्या सुरुवातीपासून त्यांचा एकमेकांशी काहीच संपर्क नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा उपासना सिंहचे काही  Unseen Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...