आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Unseen Photos:या 10 वर्षांच्या कलाकाराने 50 पेक्षा जास्त जाहिरातीत केलेय काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : गेल्यावर्षी 'पहरेदार पिया की' हा शो खुप चर्चेत होता. या शोमध्ये 18 वर्षांची मुलगी आणि 10 वर्षांच्या मुलाचे लग्न या कंसेप्टमुळे खुप वाद झाला होता. यामुळे हा शो 43 दिवसातच बंद करण्यात आला. या शोमध्ये छोट्या रतन साची प्रमुख भूमिका साकारणारा अफान खानला हा शो ऑफ एयर झाल्यामुळे अनेक अडचणी आल्या. अफानने नुकतीच आमच्या वेबसाइटशी बातचीत केली. यामध्ये त्याने शोच्या वादापासून तर त्याच्या अपकमिंग शोविषयी सांगितले.


या शोमधून कमबॅक करतोय अफान...

- अफानने बातचीत करताना सांगितले की, "प्रामाणिकपणे सांगायचे तर हा शो सुरु ठेवण्याचा आम्ही खुप प्रयत्न केला. परंतू हा शो खुप कमी वेळेल बंद करावा लागला."
- "आता ऑडियन्सचा पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही इग्नोर करु शकत नाही. सर्वांचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो."
- "महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अजूनही सोशल मीडियावर अनेक मॅसेजेस येतात. ज्या लोकांना राजपूत रतन सिंहची भूमिका आवडली होती. ते फोन मेसेजेस करतात."
- "एक कलाकारा म्हणून मला या शोमधून खुप काही शिकायला मिळाले. मी सेटवर अनेक लोकांना भेटलो. हा प्रवास खुप छोटा होता परंतू इंट्रेस्टिंग होता."
- अफानने सांगितले की, "आता मी 9 महिन्यांच्या गॅपनंतर कमबॅक करणार आहे. माझ्या नवीन शोचे नाव 'रुप-मर्द का नया स्वरुप है' असे आहे."

 

50 पेक्षा जास्त जाहिरातींमध्ये केले काम
- 27 ऑक्टोबरला भुसावळमध्ये अफानचा जन्म झाला. त्याचे बालपण मुंबईत गेले. त्याचे वडील जमील खान मुंबईच्या एका बँकेत IT मॅनेजर आहेत तर आई हाउस वाइफ आहे.
- CP गोयनका इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो 5 वीत शिक्षण घेतोय. अफानला एक मोठी बहिण इफराक खान आणि लहान भाऊ अर्सलन खान आहे.
- अफानने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जाहिरातींमध्ये काम केलेय. तो 5 वर्षांचा असताना त्याने पहिली जाहिरात केली होती.
- एवढेच नाही तर त्याने 6-7 शोजमध्ये काम केलेय. पहरेदार पिया कीमध्ये तो प्रमुभ भूमिकेत होता. त्याने  'Sacred Games' नावाच्या चित्रपटात काम केले आहे. यामध्ये तो बालपणीच्या सैफ अली खानच्या भूमिकेत होता. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अफानचे 11 Unseen Pictures...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...