आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव-याकडे परतली कपिल शर्माची 'बुआ', 6 वर्षांपासून राहत होती वेगळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कपिल शर्माची ऑनस्क्रीन बुआ उपासना सिंह आपल्या पतीकडे परतली आहे. रिपोर्टनुसार ती पुन्हा नीरजसोबत राहत आहे. उपासना नवरा नीरज भारव्दाजपासून गेल्या 6 वर्षांपासून वेगळी राहत होती. तिने 'साथ निभाना साथिया' या मालिकेचा अभिनेता नीरज भारव्दाजसोबत 2009 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षांतच दोघांमध्ये वाद झाला होता. उपासनाने कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट्स विद कपिल या शोमध्ये बुआची भूमिका साकारली होती.


2016 मध्ये फायनल केला डिवोर्स...
- उपासना सिंह 2012 पासून नव-यापासून वेगळी राहत होती.
- दोघांनी 2016 मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. परंतू दोघांनी वाद मिटवून घेतला. 
- दिर्घकाळपासून दोघांचे बोलणे पसंत होते. आता दोघांनी प्रकरण मिटवून घेतले आहे.
- उपासना, नीरजसोबत नुकतीच गंगटोकमध्ये व्हॅकेशनसाठी गेली होती.
- नीरज भादरव्दाजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, एकमेकांना स्पेस देताना आमच्यातील दूरावा वाढला होता.
- नीरजने सांगितले की, बाहेरच्या काही लोकांनी आमच्यातील तणाव वाढवला.

 

असे झाले होते दोघांचे अफेअर
उपासना सिंहने  'ऐ दिल-ए नादान' या मालिकेत नीरज भारव्दाजसोबत काम केले. यावेळी दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 2009 मध्ये दोघांनी लग्न केले. उपासनाने टीव्ही सीरियल्ससोबतच अनेक चित्रपटांमध्ये काम केलेय. तिने 'डर', 'मैं प्रेम की दीवानी हूं', 'मुझसे शादी करोगी', 'ऐतराज', 'गोलमाल रिटर्न्स'  मध्ये काम केलेय. तर नीरजने अनेक भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा उपासना-नीरजचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...