आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूलमध्ये चिल करताना दिसली टीव्हीची 'कोमोलिका', बालीमध्ये करतेय हॉलिडे एन्जॉय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस सीजन 6'ची विजेती राहिलेली उर्वशी ढोलकिया सध्या आपल्या फ्रेंड्ससोबत बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिचे पूल चिल करतानाचे काही फोटोज समोर आले आहे. उर्वर्शीने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये रेड कलरच्या बिकनीमध्ये दिसतेय. एक फोटो पोस्ट करत तिने  Another world Another heaven .... life is bliss 💋❤️. असे कॅप्शन दिले आहे. तर अजून एक फोटो शेअर करत तिने Looking up .. that’s the only thing I know असे कॅप्शन दिलेय. उर्वशीला 23 वर्षांची जुळी मुलं आहेत. त्यांचे नाव सागर आणि क्षितिज आहे. वृत्तांनुसार उर्वशीचे लग्न वयाच्या 15 व्या वर्षी झाले होते. 16 व्या वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. परंतू लग्नाच्या दिड वर्षांनंतरच ती नव-यापासून वेगळी झाली. उर्वशीने कोणत्या व्यक्तीसोबत लग्न केले होते याची माहिती उपलब्ध नाही.

 

सिंगल मदर
- नव-यापासून वेगळे झाल्यानंतर तिने सिंगल मदर बनून दोन्ही मुलांचे संगोपन केले.
- उर्वशीने वयाच्या 6 व्या वर्षी जाहिरातीत काम केले होते. यानंतर ती 'देख भाई देख' या टीव्ही मालिकेत दिसली होती. उर्वशीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. परंतू 'कसौटी जिंदगी की' मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेतून तिला खरी ओळख मिळाली.
- तिने 'घर एक मंदिर', 'कभी सौतन कभी सहेली', 'कहीं तो होगा', 'घर एक मंदिर', 'कहानी तेरी मेरी', 'बेताब दिल की तमन्ना है', 'बड़ी दूर से आए हैं' सारख्या टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. सध्या ती कलर्सच्या 'चंद्रकांता' मध्ये दिसतेय.
- एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीला दुस-यांदा लग्न करण्याविषयी विचारण्यात आले होते, तेव्हा ती म्हणाली होती की, - "मी सिंगल मदर आहे आणि माझ्यावर अनेक जबाबदा-या आहेत. माझ्या जवळ विचार करण्यासाठी वेळ नाही."
- आपल्या मुलांच्या करिअरविषयी उर्वशी सांगते की, त्यांना आवडेल त्या फिल्ममध्ये ते करिअर बनवू शकता. त्यांना पुर्ण स्वातंत्र्य आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा उर्वशीचे फोटोज...
 

बातम्या आणखी आहेत...