आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 16 व्या वर्षी या अभिनेत्री दिला होता जुळ्या मुलांना जन्म, दिड वर्षात मोडले होते लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 25 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख बनवनारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया बिग बॉसची विजेती ठरल्यानंतर 4 वर्षांपासून इंडस्ट्रीमधून गायब होती. यानंतर ती आता राणी इरावतीच्या 'चंद्रकांता' मालिकेत दिसतेय. रिपोर्ट्सनुसार वयाच्या 15 वर्षी तिचे लग्न झाले होते. 16 वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. सागर आणि क्षितिज असे त्यांचे नाव आहे. लग्नाच्या दिडवर्षांनंतरच ती पतीपासून वेगळी झाल्याचे बोलले जाते. यानंतर तिने सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला.


केले हे खुलासे
उर्वशी ढोलकियासोबत बोलल्यानंतर तिने तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफविषयी काही खुलासे केले.

 

माझ्या दोन्ही मुलांना अॅक्टर बनायचे आहे
माझ्या दोन्ही मुलांना अॅक्टिंगमध्ये करिअर बनवायचे आहे. मला त्यांना एकच सल्ला द्यायचा आहे की, अॅक्टर बनण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी तयार राहा. कारण आता इंडस्ट्री पहिल्यासारखी नाही. येथे काम करण्यासाठी अनुभव खुप आवश्यक असतो. कॅमेरा मागचा अनुभव कसा असतो हे त्यांना माहित असायला हवे. एक आई म्हणून मी मुलांना हाच सल्ला देऊ शकते. माझ्या मुलांनी मला नेहमीच साथ दिली. आता माझी वेळ आहे त्यांना साथ देण्याची.

 

अॅक्टिंग करिअर राहिले शानदार
25 वर्षांत एक गोष्ट बदलली आहे. आमच्यावेळी कामाविषयी काही मर्यादा नव्हत्या. एकदा शूटिंग सुरु झाली की, ती कधीपर्यंत चालेल हे सांगता येत नव्हते. यामुळे आम्हाला वयक्तिक आयुष्यात वेळ मिळत नव्हता. परंतू आता असे नाही. जास्तीत जास्त प्रोडक्शन हाउस योग्य प्रकारे सर्व काही मॅनेज करतात. यामुळे आता आम्ही वेळेवर घरी पोहोचतो. मी गेल्या काही वर्षात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अभिनयाचा प्रवास अवघड होता परंतू अशक्य नव्हता. या क्षेत्राने मला खुप काही दिले आहे. यामुळे मी म्हणू शकते की, माझा अभिनयाचा प्रवास खुप शानदार झालाय.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा उर्वशी ढोलकियासंदर्भात काही गोष्टी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...