आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसारामसह तीन आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सहआरोपींना 20-20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर दोन जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. पॉक्सो अॅक्टमध्ये झालेल्या बदलानंतर आलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. एक काळ असा होता, जेव्हा आसारामचे केवळ सामान्यच नव्हे तर राजकारणापासून बॉलिवूडपर्यंत अनेक जण भक्त होते. विनोदवीर कपिल शर्माच्या शोमध्ये जजच्या भूमिकेत झळकलेले नवज्योत सिंग सिद्धू
हे देखील आसामाचे मोठे भक्त राहिले आहेत. त्यांचा आसारामच्या दरबारातील एक जुना व्हिडिओ यूट्युबवर उपलब्ध असून यामध्ये ते आसारामसमोर नतमस्तक झालेले आणि त्याचे गुणगान गाताना दिसत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.