आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सास-यांसोबत ड्रिंक तर पतीसोबत पिला हुल्ला, या टीव्ही अॅक्ट्रेसने असा सेलिब्रेट केला बर्थडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेतील शगुन अर्थातच अभिनेत्री अनिता हसनंदानीचा आज (14 एप्रिल) वाढदिवस असून तिने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. अनिता यंदाचा वाढदिवस तिच्या कुटुंबीयांसोबत गोव्यात सेलिब्रेट करत आहे. अनिताच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये ती फक्त हुक्काच नव्हे तर सास-यांसोबत ड्रिंक करताना दिसतेय.  स्वतः अनिताने हे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनिताचे सासरे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत. सून आणि मुलाच्या ते अतिशय क्लोज आहेत. 


2013 मध्ये बिझनेसमनसोबत थाटले होते लग्न...

- अनिता आणि रोहित यांचे लव्ह मॅरेज आहे. हे दोघेही एकाच जिममध्ये वर्कआउटसाठी जायचे. येथेच दोघांची भेट झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
- काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अनिताने 14 ऑक्टोबर 2013 रोजी रोहितसोबत लग्न केले. रोहित तेलुगु असून त्यांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने झाले होते. रोहित एक बिझनेसमन असून त्याचा बिझनेस गोव्यात आहे.
- काव्यांजली (2005-06) च्या सेटवर अनिता आणि अभिनेता एजाज खआन यांच्या अफेअरची चर्चा होती. पण काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते.

एकता कपूरसोबत आहे रोहितचे घनिष्ठ नाते...
- अलीकडेच अनीता ‘ये हैं मोहब्बतें’च्या शूटच्या निमित्ताने लंडनला गेली होती. त्यावेळी रोहितदेखील तिच्यासोबत लंडनला गेला होता.
- रोहित एकता कपूरचा जवळचा मित्र आहे. एकता रोहित आणि अनितासोबतचे फोटोत नेहमी शेअर करत असते.


या टीव्ही शो आणि चित्रपटांमधून प्रसिद्ध झाली अनिता...
- मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केल्यानंतर अनिताने 'कभी सौतन कभी सहेली' (2001) या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.
- 'काव्यांजली', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसम से' मध्ये काम केल्यानंतर आता अनिता 'ये है मोहब्बतें'मध्ये शगुनच्या भूमिकेत झळकत आहे.
- टीव्ही मालिकांसोबतच अनिता चित्रपटांमध्येही झळकली आहे. कुछ तो है (2003), ये दिल (2003), कृष्णा कॉटेज (2004), सिलसिले (2005), रागिनी एमएमएस 2 (2014), हीरो (2015) या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा अनिता हसनंदानीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...