आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ये है मोहब्बतें' फेम मिहिका वर्माला पुत्ररत्न, बेबी बंपचा फोटो शेअर करुन दिली Good News

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'ये है मोहब्बतें' या मालिकेत झळकलेली अभिनेत्री मिहिका वर्मा आई झाली असूून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिने इंस्टाग्रामवर ही गोड बातमी शेअर केली. ही गोड बातमी मिहिकाने एका खास अंदाजात चाहत्यांसोबत शेअर केली. तिने पती आनंद कापियासोबतचा एख जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत मिहिकाचे बेबी बंप दिसत आहे. मिहिकाने फोटोला कॅप्शन दिले, 'Knock knock...❤️'. मिहिकाने लग्नापूर्वीच 'ये है मोहब्बतें' ही मालिका सोडली होती. या मालिकेत तिने दिव्यांका त्रिपाठीच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली  होती. 


2016मध्ये बिझनेसमनसोबत थाटले होते लग्न... 
मिहिकाने NRI बिजनेसमन आनंद कापियासोबत 2016मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या दोन वर्षांनी ती आई झाली आहे. मिहिकाने 2007 मध्ये  'विरुद्ध' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'कितनी मोहब्बत है', 'किस देश में है मेरा दिल', 'ये है आशिकी' आणि 'इतना करो न मुझे प्यार' या मालिकांमध्ये काम केले. सध्या तिने कामापासून ब्रेक घेतला आहे.