आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिना खानने केले असे ट्रान्सफॉर्मेशन, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले कामवाली दिसतेय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस' एक्स कंटेस्टेंट हिना खानचा एक फोटो नुकताच समोर आलाय. यामध्ये तिला ओळखणेही कठीण झालेय. या फोटोमध्ये ती घरकाम करणारी महिला दिसतेय. फोटोमध्ये तिच्या भांगेत कुंकू, हातात बांगड्या-अंगठ्या आणि टिपिकल टाइपचा मेकअप दिसतोय. हिनाचा हा लूक तिचा आगामी चित्रपट 'स्मार्टफोन' साठी आहे. सध्या ती याच शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 14 जानेवारीला 'बिग बॉस-11' फिनाले झाल्यानंतर हिनाजवळ कोणताच प्रोजेक्ट नव्हता. 


सोशल मीडियावर हिनाच्या फोटोवर येता असे रिअॅक्शन
- हिनाने सोशल मीडियावर आपला हा फोटो शेअर करत लिहिले की, "अॅक्टिंगसाठी असलेले माझे प्रेम माझ्यासाठी अनेक आव्हान घेऊन आले आहेत. मला स्वतःला चॅलेंज करणे आवडते. एका प्रतिमेतून दूस-या प्रतिमेत परावर्तित होणे माझा अनुभव वाढवते. मी प्रयत्न केलाय, तुम्हाला आवडेल अशी आशा आहे."

- हिनाच्या या न्यू लूकला सोशल मीडिया यूजर्स ट्रोल करत आहेत. अनेक लोका तिचा हा लूक पाहून तिला कामवाली म्हणत आहेत. एका यूजरने लिहिले, "माझ्या घरची कामवाली सुट्टीवर गेली आहे, कामावर येऊन जा"

- तर हिनाच्या काही फॅन्सला तिचा हा लूक आवडला आहे. यूजर्सने तिची अॅक्टिंग स्किल आणि ट्रान्सफॉर्मेशनची प्रशंसा केली आहे.
- ती फक्त शॉर्ट फिल्ममध्येच नाही तर लवकरच एका पंजाबी गाण्यातही दिसणार आहे. याची माहिती तिने ट्वीटवर आपल्या फॅन्सला दिली. 
- हिनाने जवळपास 7 वर्ष 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये काम केले. तर 'बिग बॉस' सोबतच ती 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाड़ी-8'  मध्ये कंटेस्टेंट म्हणून दिसली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हिनाच्या ट्वीटवर सोशल मीडियावर येणा-या कमेंट्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...