आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Miscarriageनंतर टीव्ही कपलने केली फॅन्सना विनंती, आम्हाला या दुःखातून सावरायला थोडा वेळ द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः 'ये है मोहब्बतें' फेम करण पटेल आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव यांनी अलीकडेच त्यांचे बाळ गमावले. अंकिताचा 20 जून रोजी गर्भपात झाला. दोघांचे हे पहिलेच अपत्य होते. बुधवारी अंकिता आणि करणच्या  स्पोक्सपर्सनने एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी करुन सांगितले, "मी मीडियाला विनंती करतो की दोघांना या कठीण प्रसंगातून बाहेर यायला थोडा वेळ द्या. सध्या परिस्थिती अतिशय नाजुक असून दोघांच्याही कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असून यावर जास्त चर्चा व्हायला नको." अंकिताचे वडील आणि अभिनेते अभय भार्गव यांनी त्यांच्या मुलीचा गर्भपात झाल्याचे उघड केले होते.


 अंकिता आणि करणला थोडा वेळ द्या.. 
- बुधवारी अंकिता आणि करणच्या स्पोक्सपर्सनने पुढे सांगितले, "आम्हाला ठाऊक आहे, की चाहत्यांना या दोघांची काळजी वाटत आहे. आम्हाला आनंद आहे, की या दुःखद प्रसंगी आम्हाला चाहत्यांकडून प्रेम आणि सांत्वना मिळत आहे. पण या कठीण प्रसंगातून बाहेर येण्यासाठी या कपलला थोडा वेळ देणे अतिशय गरजेचे आहे. त्यांना प्रायव्हसीची गरज आहे." 
- अंकिता 4 महिन्यांची गर्भवती होती. मुलाच्या आगमनाची चाहूल लागलेल्या अंकिताने अलीकडेच एक फोटोशूटदेखील केले होते.


नोव्हेंबर महिन्यात होणार होती अंकिताची डिलिव्हरी...
- अंकिताची डिलिव्हरी नोव्हेंबर महिन्यात होणार होती. हे अंकिता आणि करण यांचे पहिले अपत्य होते. बाळाच्या आगमनाची चाहुल लागल्याने हे दोघेही आनंदात होते. याचवर्षी एप्रिल महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून करणने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. त्याने आपला आनंद व्यक्त करताना लिहिले होते. "अंकिता भार्गव आणि माझ्यासाठी नोव्हेंबर महिन्यात मोठा सण येतोय. त्यासाठी मी एवढा एक्साइटेड आहे, की प्रतिक्षा केली जात नाहीये."


पहिल्यांदा आई होणार होती अंकिता...
- अंकिता आणि करणचे 3 मे 2015 रोजी मुंबईत लग्न झाले होते. अंकिता पहिल्यांदा आई होणार होती. अलीकडेच झालेल्या गोल्ड अवॉर्ड सोहळ्यात अंकिता करणसोबत पोहोचली होती. पिंक गाऊनमधून तिचे बेबी बंप फ्लॉन्ट झाले होते. अंकितासुद्धा एक अभिनेत्री असून तिने 'संजीवनी' (2002), 'देखा एक ख्वाब ' (2011-12) आणि 'रिपोर्टर्स'(2013) या मालिकांमध्ये काम केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...