आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex बॉयफ्रेंडने Kiss केल्यामुळे भडकली अभिनेत्री, लग्नापुर्वीच मोडला होता साखरपुडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'मेरे अंगने मै'(2015) मध्ये भाऊ-बहिणीची भूमिका साकारणारे चारु असोपा आणि नीरज मालवीय यांच्यामध्ये सेटवर प्रेम झाले. दोघांनी साखरपुडा केला, परंतू लग्नापुर्वीच त्यांचे नाते मोडले. नुकतेच एका इव्हेंटमध्ये चारुने नीरजवर जबरदस्ती किस करण्याचा आरोप लावलाय. हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे बोलले जातेय. 


असे आहे पुर्ण प्रकरण
चारु आणि नीरज दोघंही बॉक्स क्रिकेट लीगमध्ये वेगवेगळ्या टीममधून खेळतात. नुकत्याच झालेल्या एका मॅचमध्ये नीरज चांगली बॉलिंग करत नव्हता. तेव्हा ऑडियन्समध्ये बसलेल्या चारुने त्याला टोमना मारत म्हटले की, तुझी लकी लेडी तुझ्यासोबत नाही, यामुळे असे होतेय. यानंतर नीरज आला आणि चारुला मिठी मारुन किस केले. हे पाहून चारुला धक्का बसला. ती भडकली आणि म्हणाली की, नीरजने हे सर्व पब्लिसिटी स्टंटसाठी केले. चारु म्हणाली की, माझे पालक माझ्यासाठी मुलगा पाहत आहे. मी त्यांच्या निर्णयामुळे खुश आहे. आपल्या करिअरवर फोकस करु इच्छिते.


2016 मध्ये केला होता साखरपुडा
नीरज-चारुने फेब्रुवारी 2016 मध्ये कुटूंबियांच्या उपस्थितीत भोपाळमध्ये साखरपुडा केला होता. 2017 मध्ये हे कपल लग्न करणार होते. परंतू असे होऊ शकले नाही. लग्न मोडल्यानंतर नीरज एका मुलाखतीत म्हणाला होता की, "अनेक वेळा 2 लोक चांगल्या मित्रांपेक्षा जास्त काहीच होऊ शकत नाही. माझ्या केसमध्ये जास्तीत जास्त अडचणी या अफवांमुळे आल्या होत्या. आम्ही दोघंही आमच्या पायांवर उभे आहोत. असेही घटस्फोटाच्या केस वाढत आहेत. अशावेळी रिलेशनशिप अशा नाजूक परिस्थितीत पुढे नेऊ नये." तर चारु म्हणाली होती की, काही पर्सनल कारणांमुळे मी साखरपुडा मोडला होता. हे काही आर्थिक कारण नव्हते परंतू अडचणी होत्या.

 

असे आले होते जवळ
- चारु आणि नीरज शोमध्ये सहभागी होण्यापुर्वीच एकमेकांना ओळखत होते. त्यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. परंतू त्यावेळी त्यांच्यात प्रेम वगैरे काही नव्हते. 
- एका मुलाखतीमध्ये नीरज म्हणाला होता, 'आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडण्यापुर्वीच ओळखत होते. एका कॉमन फ्रेंडमुळे आमची भेट झाली होती. परंतू जे होते ते योग्य वेळीच होते. आम्ही जेव्हा एका शोमध्ये काम करणे सुरु केले, तेव्हा आम्ही प्रेमात पडलो'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चारु-नीरजचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...