आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरुष्काची Kiss कॉपी केल्याने उडवली पुनीश-बंदगीची खिल्ली, दिले सडेतोड उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस-11' फेम पुनीश शर्मा आणि बंदगी कालराने नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्माला कॉपी करत एक रोमँटिक फोटो पोस्ट केला होता. जसे अनुष्का शर्माने विराटला किस केले होते अगदी तशाच पध्दतीने बंदगी पुनीशला किस करत होती. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना खुप ट्रोल केले गेले. यूजर्स त्यांना लेडीलव्ह कॉपीकेट म्हणत आहेत. तर काही त्यांना म्हणाले की, तुम्ही स्वतःविरुष्का समजतात का. यावर पुनीशने हेटर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

 

पुनीशने असे दिले उत्तर
- पुनीशने ट्वीट करत लिहिले "मी मिस्टर अँड मिसेस कोहलीचा खुप सन्मान करतो. मी दोघांचा खुप मोठा फॅन आहे."
- "जे लोक मला म्हणताय की, मी त्या कपलला कॉपी केले. तर मी त्यांना कॉपी केलेय आणि वारंवार करेल. कारण मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्यामध्ये जे प्रेम आहे, त्यावरही मी प्रेम करतो."
"हे कपल माझे आयडल आहेत. प्लीज तुम्ही या दोन्ही फोटोंची तुलना करणे बंद करा. मी फक्त त्यांचा फॅन आहे आणि नेहमीच राहिल."
- बंदगी, पुनीशपुर्वी 'बिग बॉस' चे कास्टिंग आणि को-डायरेक्टर डेनिस नागपालला डेट करत होती. परंतू आता त्यांचे ब्रेकअप झालेय.


बिझनेसमनचा मुलगा आहे पुनीश 
- दिल्लीत राहणारा पुनीश शर्मा एका कंस्ट्रक्सन कंपनीचा मालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो विवाहीत आहे. 
- पार्टीसाठी क्रेझी असलेला पुनीश त्याचा पैसा बार आणि पबमध्ये खर्च करतो. 
- श्रीमंत घरातील पुनीश शर्मा कितीतरी कोट्यवधी रुपये पार्टीत खर्च करतो. 
- पुनीशने बंदगीसोबतच बिग बॉस हाऊसमध्ये एंट्री घेतली होती आणि तो टॉप 4 मध्ये पोहोचला होता. पण विनर अनाऊंसमेंट होण्याअगोदर तो घरातून बाहेर झाला.

कोण आहे बंदगी
- दिल्लीची राहाणारी बंदगी कालरा हिने बीटेक केले असून, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ती सीनियर इंजिनिअर आहे. 
- 25 वर्षांची बंदगी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. दररोज आपले हॉट फोटो सोशल मीडियाव अपलोड करण्याचा तिला छंद आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पुनीशने दिलेले उत्तर आणि त्यांचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...