आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुमधडाक्यात डान्स करत मांडवात पोहोचली नवरी, लग्नात घातला पांढरा लहेंगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलाइक विवाह बंधनात अडकली आहे. लग्नात रुबीनाने व्हाइट लहेंगा घातला होता. यावर ग्रीन अँड पिंक कलरचे फ्लोवर वर्क होते. यासोबत व्हाइट ज्वेलरी होती. रुबीनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती धुमधडाक्यात मांडवात एंट्री घेताना दिसतेय. तर इकडे तिचा होणारा नवरा अभिनव शुक्ला विवाहस्थळी वरात घेऊन पोहोचला आहे. लोकेशनचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये अभिनव वारात घेऊन रुबीनाला घेण्यासाठी जातो. त्याने ब्लू अँड पिंक कलरची शेरवानी घातली आहे.


लग्नात पोहोचले हे सेलेब्स 
-दिर्घ काळापासून डेटिंग करत असणारे हे कपल गुरुवारी शिमल्याच्या वुडविल पॅलेसमध्ये विवाह बंधनात अडकले. दोघांनी पंजाबी आणि हिमाचली पध्दतीने लग्न केले.
- बुधवारी रुबीना आणि अभिनवची मेंदी, साखरपुडा आणि संगीत सेरेमनी झाली. यामध्ये रुबीना ऑलिव कलरच्या इंडो-वेस्टर्न ड्रेस आणि अभिनव ब्लू अँड व्हाइट कॉम्बिनेशनच्या कुर्ता-पजामामध्ये दिसला.
- रुबीनाच्या संगीत सेरेमनीमध्ये शरद केळकर, किर्ती गायकवाड, हुसैन कुवजेरवाला, टीना कुवजेरवाला, सुरवीन चावलासोबतच अनेक टीव्ही सेलेब्स पोहोचले आहेत. येथे सर्वांनी डान्स परफॉर्मेंस दिला.
- लग्नाच्या दोन दिवसांनंतर रिसेप्शन होणार आहे. पहिले रिसेप्शन 24 जूनला लुधियाना आणि 28 जूनला मुंबईमध्ये एक रिसेप्शन होईल.


या मालिकांमध्ये झळकली रुबीना...
- रुबीनाने 'छोटी बहू' (2008-10) आणि मालिकेच्या सिक्वेल (2011-12) मध्ये लीड रोल साकारला होता.
- याशिवाय ती 'सास बिना ससुराल' (2012), 'पुनर्विवाह' (2013), 'देवों के देव...महादेव'(2013-14) आणि 'जीनी और जूजू' (2013-14) या मालिकांमध्ये झळकली आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...