आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह बंधनात अडकली रुबीना दिलाइक, असा पार पडला विवाह सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलाइक आफला लाँग टाइम बॉयफ्रेंड अभिनव शुक्लासोबत विवाह बंधनात अडकली आहे. गुरुवारी शिमलाच्या वुडविल पॅलेसमध्ये ती बोहल्यावर चढली. पंजाबी आणि हिमाचल पद्दतीने तिने लग्न केले. नववधूच्या रुपात रुबीना खुप सुंदर दिसत होती. तिने व्हाइट लहेंगा घातला होता, यावर ग्रीन अँड पिंक कलरचे फ्लोरल वर्क होते. यासोबत तिने गोल्डन कलरची ज्वेलरी कॅरी केली होती. तर अभिनवने लग्नात ब्लू अँड पिंक कलरची शेरवानी घातली होती. वेडिंग फोटोमध्ये कपल एकत्र मॅचिंग आउटफिटमध्ये खुप सुंदर दिसले. 


वरमाळा घातलाना अभिनवला आल्या अडचणी
- रुबीना आणि अभिनवचा वरमाळा घालतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हे कपल कुटूंबासोबत हा विधी करताना दिसत आहेत. 
- रुबीना अगदी सहज अभिनवच्या गळ्यात वरमाळा घालते. तर अभिनवची वेळ येता रुबीनेचे भाऊ तिला वर उचलतात, ज्यामुळे अभिनवला वरमाळा घालताना अडचणी येतात. 
- समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अभिनवला त्याचे मेहूणे थट्टा मस्करीत त्रास देताना दिसत आहेत.


रुबीना-अभिनवच्या लग्नात पोहोचले टीव्ही सेलेब्स
-बुधवारी रुबीना आणि अभिनवची मेंदी, साखरपुडा आणि संगीत सेरेमनी ठेवण्यात आली होती. यामध्ये रुपीना ऑलिव्ह कलरच्या इंडो-वेस्टर्न ड्रेस आणि अभिनव ब्लू अँड व्हाइट कॉम्बिनेशनचा कुर्ता-पजामा घालून दिसली.
- रुबीनाच्या संगीत सेरेमनीमध्ये शरद केळकर, किर्ती गायकवाड, हुसैन कुवजेरवाला, टीना कुवजेरवाला, सुरवीन चावलासोबतच अनेक टीव्ही सेलेब्स पोहोचले आहेत. येथे सर्वांनी डान्स परफॉर्मेंस दिला.
- लग्नाच्या दोन दिवसांनंतर रिसेप्शन होणार आहे. पहिले रिसेप्शन 24 जूनला लुधियाना आणि 28 जूनला मुंबईमध्ये एक रिसेप्शन होईल.


या मालिकांमध्ये झळकली रुबीना...
- रुबीनाने 'छोटी बहू' (2008-10) आणि मालिकेच्या सिक्वेल (2011-12) मध्ये लीड रोल साकारला होता.
- याशिवाय ती 'सास बिना ससुराल' (2012), 'पुनर्विवाह' (2013), 'देवों के देव...महादेव'(2013-14) आणि 'जीनी और जूजू' (2013-14) या मालिकांमध्ये झळकली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रुबीना दिलाइक आणि अभिनव शुक्लाच्या लग्नाचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...