आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVची 'बहू' हिना खानने इंस्टाग्रामवर शेअर केले फोटोज, ट्रोलर्सने साधला निशाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत अक्षराची भूमिका साकारणारी हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. ट्रोलर्सनी पुन्हा एकदा तिच्यावर निशाना साधला आहे. हीना खानने आपल्या इंस्टाग्रामवर हे बोल्ड फोटोज शेअर केले आहे. फोटोज शेअर करत तिने लिहिले की, 'आपले आयुष्य संधीने नाही तर बदलाने सुधारु शकते' हा फोटो तिने गोवा इव्हेंटसाठी क्लिक केले होते. सोशल मीडियावर हिनाचे हे बोल्ड फोटोज पाहून यूजर्सने तिला ट्रोल करणे सुरु केले आहे. एका यूजरने लिहिले, 'बुढी घोडी लाल लगाम, आता तरी समजून घे' तर एका यूजरने कमेंट केली की, 'कपडे फाडून काम मागतेय' अशाच प्रकारे इतर यूजर्सनेही हिनाच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.
- एका यूजरने लिहिले - 'आता राखी सावंत सारखे वागणे सुरु झालेय. काही काम मिळत नाहीये तर तिने कपडे काढणे सुरु केले. ती विचार करत असेल की, कुणी काम देईल. तु काहीच नाही, फक्त राखी सावंतचा दुसरा व्हर्जन आहे.' 
- एकाने लिहिले - 'या फोटोपेक्षा खराब तुझा कोणताच फोटो नाही.'
- एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, 'हिना खान थोडी लाज वाटू दे, तु मसलमान आहे.'
- 30 वर्षांच्या हिनाजवळ सध्या कोणतेच काम नाही. ती शेवटच्या वेळी 'बिग बॉस'मध्ये दिसली होती.
- हिनाने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात स्टार प्लसच्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून केली होती. यासोबतच ती कयामत', 'परफेक्ट ब्राइड', 'सपना बाबुल का बिदाई', 'चांद छुपा बादल में' सारख्या मालिकांमध्ये दिसली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हिना खानचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...