आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेहाला बिलगून झोपायची 5 वर्षांची चिमुरडी, कहाणी ऐकून सुन्न झाले बिग बी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन - Divya Marathi
अमिताभ बच्चन
 
मुंबईः 'गूंज' या एनजीओ फाउंडर अंशु गुप्ता या आठवड्यात 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केबीसीच्या 'नई चाह नई राह' या उपक्रमांतर्गत ते शुक्रवारी झालेल्या एपिसोडचे खास पाहुणे होते. यावेळी अंशु बिग बींसोबत केवळ हा खेळच खेळले नाहीत, तर गुंजची मुहूर्तमेढ त्यांनी कशी आणि का रोवली याची कहाणीसुद्धा सांगितली. 
 
जेव्हा पाच वर्षांची चिमुरडी म्हणाली, मृतदेहाला बिलगून झोपी मी जाते...
- अंशु यांनी सांगितले, की ते डेहराडूनहून दिल्लीत आले होते. त्यांनी दिल्लीतील थंडीच्या कडाक्याने मृत्यू झालेले लोक पाहिले. जेव्हा ते रेडलाइट एरियातील मुलांना भीख मागताना बघायचे, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न कायम उपस्थित होत असे, की ही मुले विना कपड्यांचे भीक का मागतातं? त्यांच्या बेसिक गरजा का पूर्ण होत नाहीत? जर भूकंप आणि पूर आपत्ती असू शकते, तर मग हिवाळ्यातील थंडी आपत्ती का होऊ शकत नाही?  हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. अंगावर पुरेसे कपडे नसल्याने दरवर्षी थंडीत अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागते, मग ही आपत्ती का मानली जात नाही.
- यासंदर्भातील एक घटना त्यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले, "मी तेव्हा मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेत होतो. एकेदिवशी बातमीच्या शोधात मी एका रुग्णालयासमोरुन जात होतो. तेथे उभ्या असलेल्या रिक्शावर 'बेवारस मृतदेह उचलणारा', असे लिहिले होते. मी त्या रिक्शाचा पाठलाग केला आणि पुढचा एक आठवड्या त्या व्यक्तीसोबत घालवला.
- रिक्शा चालाक हबीब यांनी अंशुला माहिती दिली, की हिवाळ्यात त्याला सर्वाधिक काम असते. कधीकधी काम आवरत नाही. या कामासाठी त्याला  20 रुपये आणि दोन मीटर कापड प्रती मृतदेह मिळत असे.
- अंशु यांनी सांगितले, की हबीब यांची पाच-सहा वर्षांची मुलगी बानोने त्यांना एक गोष्ट सांगून सून्न केले होते. बानोने अंशु यांना सांगितले होते, की जेव्हा खूप थंडी वाजते, तेव्हा ती एखाद्या मृतदेहाला बिलगून रात्री झोपी जाते. कारण मृतदेह त्रास देत नाही. 
- बिग बीसुद्धा अंशु यांनी सांगितलेली घटना ऐकून सून्न झाले होते.

अशी रोवली गेली 'गूंज'ची मुहूर्तमेढ...
- अंशु यांनी सांगितले, "पाच-सहा वर्षांच्या बानोची गोष्ट ऐकून दिल्लीच्या फुटपाथवर राहणा-या लोकांची ही एक मोठी समस्या असल्याचे मला समजले. माझ्याजवळ समस्या होती, पण त्यावर उपाय नव्हता. त्यानंतर मी 1998 साली नोकरी सोडली आणि घरातून गरीबांना दान करण्यासाठी  67 पर्सनल कपडे काढले. येथूनच ही चळवळ सुरु झाली आणि आज संपूर्ण देशभरातून आम्ही तीन टनच्या जवळपास मटेरियल हॅण्डल करतो."
- अंशु यांनी सांगितले, की 'गूंज'ची टीम आज बिहार, उडीसासह  22 राज्यांतील दुर्गम गावांत काम करते.
- 2015 साली अंशु यांना त्यांच्या या समाजसेवेसाठी रमन मॅग्सेसे अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.

पत्नी आणि मुलीसोबत 'केबीसी'त पोहोचले होते अंशु गुप्ता...
- अंशु गुप्ता 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये पत्नी मीनाक्षी आणि मुलगी उर्वीसोबत सहभागी झाले होते. मीनाक्षी अंशु यांची जोडीदार बनून तर उर्वी कम्पेनियनच्या रुपात उपस्थित होती. उर्वीने शोमध्ये सांगितले, की तिचा जन्म 1999 साली झाला तर गूंजची स्थापना 1998 मध्ये झाली. याच कारणामुळे गूंज उर्वीचा मोठा भाऊ असल्याचे लोक म्हणतात. गूंजची स्थापना होण्याच्या तीन वर्षांपूर्वी अंशु आणि मीनाक्षी यांचे लग्न झाले होते.

अमिताभ यांनी दान केले 'KBC'त मिळालेले कपडे...
- एपिसोडदरम्यान अमिताभ बच्चन यांनी सांगितले, की 'केबीसी'साठी त्यांना फीससोबतच कपडेसुद्धा मिळतात. पण ते कपडे ते बाहेर वापरत नाहीत. त्यामुळे हे कपडे गूंजला दान करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. जेणेकरुन या कपड्यांचा योग्य वापर होईल.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, अंशू, त्यांची पत्नी आणि मुलीचे फोटोज..  
बातम्या आणखी आहेत...