आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BIGG BOSS-8: पहिल्या दिवशी काय होते खास, वाचा आणि Pixमध्ये पाहा झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुकिर्ती कांडपाल आणि उपेन पटेल)
मुंबईः कॅप्टन सलमान खानसोबत 'बिग बॉस-8'च्या फ्लाइटचा प्रवास सुरु झाला आहे. प्लेनच्या सीटवर रात्र घालवल्यानंतर सर्व पॅसेंजर्स (स्पर्धक)च्या सकाळची सुरुवात 'ये कहां आ गए हम' या सुंदर गीताने झाली. किचन उपलब्ध नसल्यामुळे जेवण किंवा नाश्ता कोठून येणार, याच्या विचारात सर्व स्पर्धक असताना त्यांना सकाळी नाश्ता आणि लंचचा एक ट्रे मिळाला.
या फ्लाइटच्या प्रवासाच्या पहिल्याच दिवशी रोमान्सची झलक बघायला मिळाली. उपेन आणि सुकिर्ती यांच्यात जवळीक निर्माण झालेली दिसली. इतर स्पर्धकांऐवजी हे दोघे एकमेकांनाच जास्त वेळ देताना दिसले. या दोघांमध्ये गप्पा रंगत असताना त्यांनी एकमेकांना निक नेमसुद्धा दिले.
उपेनने सुकिर्तीला सुक्कू हे निक नेम दिले. यावेळी आर्य बब्बर विचार करत होता, की एखाद्याला भेटायला हे जगातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. पहिल्या दिवशी या सर्व स्पर्धकांनी Dumb Charades खेळासोबत एका फॅशन शोचे आयोजन केले होते. मात्र हा फॅशन शो विदाउट म्युझिक होता. त्यांच्या या फॅशन शोची थीम 'सुपरनॅचुरल बीइंग्स' ही होती. यामध्ये सर्व स्पर्धकांना व्हॅम्पायर्स आणि जॉम्बिजचा लूकमध्ये रॅम्पवर यायचे होते.
यंदाच्या सिझनमध्ये ट्विस्ट म्हणून सिक्रेट सोसायटीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एकुण तीन जण असून त्यांच्याकडे या सर्व पॅसेंजर्स (स्पर्धकांना)ना कंट्रोल करण्याची पॉवर आहे. सर्व पॅसेंजर्सना त्यांचा आदेश स्वीकारुन त्यांना आनंदी ठेवायचे काम करायचे आहे. अखेरीस केवळ सहा स्पर्धकांना त्यांचे सामान मिळाले. इतर स्पर्धकांना त्यांचे लगेज मिळवण्यासाठी 'कुर्बानिया' नावाचा टास्क करावा लागणार आहे. आता हे सर्व पॅसेंजर्स सिक्रेट सोसायटीला खूश करु शकणार की नाही, हे बघणे इंट्रेस्टिंग ठरणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पहिल्या दिवसाची निवडक छायाचित्रे...