आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टीव्ही अॅक्ट्रेसवर झाला वहिणीला मारहाण केल्याचा आरोप, दाखल झाला गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अॅक्ट्रेस संजिदा शेखची वहिणी जाकिराबानो झाकीर हुसेन बागबानने डोमेस्टीक व्हायलन्सचा गुन्हा दाखल केला आहे. संजिदाच्या वहिणीने तिचा पती अनस अब्दुल रहीम शेख आणि संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात ही कारवाई केली आहे. 

CRPC ची कलम 125..
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार CRPC च्या कलम 125 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका लीडिंग डेलीला दिलेल्या माहितीनुसार जकिरा म्हणाला, माझ्या सासरचे लोक माझ्या वडिलांकडे नेहमी पैशांची मागणी करतात. तसेच माझ्यावर हातही उचलतात. माझा नवरा खूप दारु पितो आणि ड्रग्जही घेतो. मॅच फिक्सिंगमध्येही त्याचा समावेश आहे. 22 वर्षीय जकिरा गेल्या काही महिन्यांपासून तिच्या अहमदाबादेतील घरीच राहते. 27 मे रोजी फोनवर बोलत असतानाच संजिदा, अनस आणि तिची सासू तिच्यावर ओरडले. तसेच तिला मारलेही. या प्रकारानंतर जकिराला अहमदाबादच्या एका हॉस्पिटलमध्ये अॅजमिट करावे लागले होते. जकिराचे म्हणणे आहे, लग्नाच्यावेळी मला अनस कन्स्ट्रक्शनचा बिझनेस करतात असे खोटे सांगितले होते. पण ते घरीच राहतात. 

घर सोडल्यापासून सासरच्या लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्नही केला नाही, असेही ती म्हणाली. संजिदा आणि तिच्या कुटुंबीयांनीही जकिराच्या विरोधात खोटं बोलल्याची तक्रार दाखल केली आहे. जकिरा जुन्या विचारांची असल्याने कुटुंबात अॅडजस्ट होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. संजिदाच्या वकिलांनी सांगितले की, कोर्टाने त्यांच्या बाजुने निकाल दिला आहे. जकिराने दाखल केलेली एफआयआर बेसलेस असल्याचे म्हटले आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संजिदाचे काही खास PHOTOS..
 
बातम्या आणखी आहेत...