आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोकुळधाममध्ये हटक्या पद्धतीने साजरी झाली राखी पौर्णिमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत आहे. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीमध्ये प्रत्येक सण काहीशा हटक्या पद्धतीने साजरा केला जातो. राखीचा सणही गोकुळधामच्या महिलामंडळाने हटक्या पद्धतीने साजरा केला. या महिलामंडळाने ट्राफिक पोलिसांना राखी बांधून खास अंदाजात राखी पौर्णिमा साजरी केली. शिवाय त्यांनी मुंबई लोकल ट्रेन आणि फायर ब्रिगेडमध्ये काम करणा-या भावांना राखी बांधली.
या मालिकेत मेन लीडमध्ये असलेल्या दिशा वखानीने सांगितले की, ''मला ही संकल्पना खूपच आवडली. आजवर कोणत्याही मालिकेत राखीचा सण अशा हटक्या पद्धतीने साजरा झालेला आपण पाहिलेला नाहीये. ट्राफिक पोलिस, मुंबई लोकल आणि फायर ब्रिगेडमध्ये काम करणा-या भावांशिवाय मुंबईचे आयुष्य सुरळीत चालू शकत नाही. त्यांच्या सर्विसेस आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच आम्ही या भावांना राखी बांधून हा सण एकजुटीने साजरा केला.''
मुक्ता-स्वप्नीलच्या 'लग्नाची दुसरी गोष्ट' फेसबुकवर 'हिट'
स्वप्निल जोशीच्या खर्‍या लग्नाची दुसरी गोष्ट...!
एका लग्नाची गोष्ट