आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Launches A New Season Of 'Satyamev Jayate'

PICS: प्रमोशनल इव्हेंटमध्ये आमिर झाला भावूक, डोळ्यात तरळले अश्रु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रमोशनल इव्हेंटमध्ये डोळे पुसताना अभिनेता आमिर खान)
मुंबई - बॉलिवूड अभिनेता आमिर खानने बुधवारी मुंबईत 'सत्यमेव जयते'च्या तिस-या पर्वाची घोषणा केली. शोचे तिसरे पर्वसुद्धा सामाजिक विषयांवर भाष्य करणार असून शोच्या फॉर्मेटमध्ये काही बदल करण्यात आले असल्याचे आमिरने यावेळी सांगितले. दाच्या पर्वात शो संपल्यानंतर आमिर तासभर देशभरातील विविध शहरांतील लोकांशी चर्चा करणार आहे. यावेळी बोलता-बोलता आमिर भावूक झाला आणि त्याचे डोळे पाणावले. त्याने आपल्या शर्टने अश्रु पुसले.
यावर्षी रिलीज होणार आमिरचा 'पीके'
आमिरचा यावर्षी 'पीके' हा एकमेव सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करणार आहे. पहिल्या पोस्टरमध्ये आमिर विवस्त्र झळकला होता. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. तर दुस-या पोस्टरमध्ये तो पूर्ण कपड्यांमध्ये दिसला. हा सिनेमा यावर्षी 19 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
मुलांनी बघू नये 'मर्दानी'...
राणी मुखर्जीच्या मर्दानीविषयी प्रश्न विचारला असता, आमिर म्हणाला, "राणी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी तिचा खूप आदर करतो. मात्र 'मर्दानी' हा हिंसक सिनेमा आहे. त्यामुळे आठ वर्षांखालील मुलांनी हा सिनेमा बघू नये."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटमधील आमिरचे भावूक क्षण...